आजकाल डेंग्यूच्या केसेस खूप जास्त वाढत आहेत आणि डेंग्यूमुळे काही लोकांचा जीवही जात आहे. डेंग्यूचा हैदोस पाहता कर्नाटकात या आजाराला महामारी घोषित करण्यात आलं आहे. डेंग्यू हा एक गंभीर आजार असून डास चावल्याने पसरतो. अशात या आजारापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
डेंग्यूचे डास इतर डासांपेक्षा वेगळे असतात. इतकंच नाही तर त्यांचा चावण्याची वेळ आणि पद्धतही वेगळी असते. डेंग्यूच्या डासांना एडीज एजिप्टी आणि एडीज एल्बोपिक्टस म्हटलं जातं. सामान्यपणे डेंग्यूची लक्षणं दोन ते तीन दिवसात दिसू लागतात. वेळीच यावर उपचार घेतले नाही तर जीवाला धोका होतो.
कधी चावतात हे डास?
डेंग्यूचे डाग सगळ्यात जास्त दिवसाच्या वेळी चावततात. सामान्यपणे ते सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान आणि दुपारी ३ ते ५ दरम्यान जास्त अॅक्टिव असतात. याचं कारण यावेळात लोक घरातील कपडे घालतात जसे की, शॉर्ट, पायजामा, टी-शर्ट यामुळे त्यांना चावण्यास सोपं होतं. रात्री जर त्यांना भरपूर प्रकाश मिळाला तर तेव्हाही ते चावतात.
डेंग्यूचे डास एडीज एजिप्टी आणि एडीज एल्बोपिक्टस हे व्यक्तीच्या खुल्या जागेवर चावतात. एजीज एजिप्टी गरमी आणि मानवी घामातून निघणाऱ्या विशिष्ट तत्वाकडे आकर्षित होतात. गरम जागा किंवा वातावरणात सगळ्यात जास्त घाम पायांवर आणि टाचांवर येतो. अशात या जागांवर डास जास्त चावतात.
शरीरावर कुठे जास्त चावतात?
जेव्हा व्यक्ती श्वास सोडते तेव्हा त्यातून CO2 निघतो. डास हे हवेत पसरलेल्या गंधाला ओळखण्यात पटाईत असतात, अशात ते हात, पाय किंवा काखेच्या मोकळ्या जागेवर चावतात. तसे डेंग्यूचे डास हात, पाय, मान आणि चेहऱ्यावरही चावू शकतात.
डेंग्यूपासून बचावाचे उपाय
- लांब बाह्यांचे शर्ट आणि फुल पॅंट घाला. त्याशिवाय घरात सॉक्स घालूनही राहू शकता.
- दरवाजे आणि खिडक्यांना जाळ्या लावा. तसेच मच्छदानीचा वापर करा. कारण एडीज एजिप्टी डास दिवसा जास्त अॅक्टिव असतात.
- भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवू नका. कूलरमध्येही डास वाढतात. त्यांची नियमितपणे स्वच्छता करा.