दररोज पांढरा तांदूळ खात आहात का? मग 'हे' जरुर वाचा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 11:20 AM2022-06-19T11:20:07+5:302022-06-19T11:20:36+5:30

White Rice Disadvantages: ही भात खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

white rice disadvantages carbs convert quickly into blood sugar higher risk of type 2 diabetes | दररोज पांढरा तांदूळ खात आहात का? मग 'हे' जरुर वाचा, अन्यथा...

दररोज पांढरा तांदूळ खात आहात का? मग 'हे' जरुर वाचा, अन्यथा...

Next

नवी दिल्ली : भारतात अनेक राज्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचे जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही. मात्र एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती अधिक प्रमाणात पांढरा तांदूळ खातात. त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. तसेच, रोज पांढरा तांदूळ खाल्ल्याने अनेक मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमचे बीपी तर वाढू शकतेच पण तुम्हाला मधुमेह आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो. ही भात खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

हृदयविकाराचा धोका
तांदळात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले कोणतेही पोषक तत्व नसतात. त्यामुळे तुम्ही जर रोज भात खात असाल तर काळजी घ्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित जानेवारी 2015 च्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की, जास्त भात खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे पांढऱ्या तांदळाच्या जास्त वापरावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या वाढू शकते
पांढरा तांदूळ खाल्ल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे महिन्यातून एकदाच पांढरा तांदूळ खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही मेटाबॉलिक समस्या टाळू शकता.

वजन वाढण्याचा धोका
जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर तुम्हाला पांढरा तांदूळ खाणे ताबडतोब बंद करावे लागेल. कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत जे लोक वजन कमी करत आहेत त्यांनी ताबडतोब पांढऱ्या तांदळापासून दूर राहावे. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. अशातच भात खाल्याने वजन वेगाने वाढते.

(महत्त्वाची सूचना : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे यासंदर्भात अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा)

Web Title: white rice disadvantages carbs convert quickly into blood sugar higher risk of type 2 diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य