वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 03:40 PM2024-06-18T15:40:19+5:302024-06-18T15:41:45+5:30
एखाद्या व्यक्तीने कोणता व्यायाम, किती वेळ करावा हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. अलीकडेच WHO ने शारीरिक हालचालींबाबत मार्गदर्शक तत्त्वं शेअर केली आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजा सहज समजू शकता.
व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी त्याची मदत होते. अनेक रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांना डायबेटीस, हार्ट डिजीज, डिप्रेशन, एंग्जायटी, स्ट्रोक, निद्रानाश यासारख्या गंभीर आरोग्य समस्या होण्याची शक्यता फार कमी असते.
WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) नुसार, व्यायाम न करणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका २०-३० टक्के जास्त असतो. दर चारपैकी एकही व्यक्ती पुरेसा व्यायाम करत नाही, असंही म्हटलं आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही ही चूक करत असाल तर तुमच्या वयानुसार किती वेळ व्यायाम करायचा आहे हे जाणून घ्या.
एखाद्या व्यक्तीने कोणता व्यायाम, किती वेळ करावा हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. अलीकडेच WHO ने शारीरिक हालचालींबाबत मार्गदर्शक तत्त्वं शेअर केली आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजा सहज समजू शकता.
वय ५ ते १७ वर्षे
दिवसातून कमीतकमी ६० मिनिटं मीडियम ते हार्ड फिजिकल एक्टिव्हिटी कराव्यात. आठवड्यातून किमान तीन दिवस फास्ट एरोबिक एक्सरसाईझ आणि स्नायू आणि हाडं मजबूत करणाऱ्या एक्टिव्हिटी केल्या पाहिजेत.
वय १८ ते ६४ वर्षे
आठवड्यातून किमान १५० ते ३०० मिनिटं मीडियम (किंवा ७५ ते १५० मिनिटं हार्ड) एरोबिक एक्टिव्हिटी करा. आठवड्यातून दोनदा स्नायू बळकट करणारा व्यायाम करा.
वय ६५ वर्षांपेक्षा जास्त
६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोकांनी देखील नियमित व्यायाम करायला हवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्ट्रेंथ आणि बॅलेन्स ट्रेनिंग देखील केलं पाहिजे.
गर्भवती महिला
दर आठवड्याला १५० मिनिटांची मध्यम-तीव्रतेची एरोबिक एक्टिव्हिटी करा. यामुळे स्नायू-मजबूत होतील.