हेल्दी फूड टेस्टी नसतं हे कोणी सांगितलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:07 PM2018-01-03T17:07:58+5:302018-01-03T17:08:43+5:30

उकडलेले, वाफवलेले, बिन तिखटामिठाचे पदार्थ म्हणजेच हेल्दी फूड हा अपप्रचार..

Who says, healthy food is not tasty? | हेल्दी फूड टेस्टी नसतं हे कोणी सांगितलं?

हेल्दी फूड टेस्टी नसतं हे कोणी सांगितलं?

Next
ठळक मुद्देहेल्दी फूडला टेस्ट नसते, हे वर्षानुवर्षांपासून आपल्या डोक्यात बिंबवलं गेल्यामुळे अनेक जण त्यापासून दूर राहतात.हेल्दी फूडमुळे अनेक आजार तुम्ही तुमच्यापासून दूर राखू शकता. तुमची एनर्जी लेवलही त्यामुळे वाढते. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.वेटलॉससाठीचा तर तो महामंत्र आहे.

- मयूर पठाडे

अनेकांपुढे महत्त्वाचा प्रश्न असतो.. हेल्दी फूड कि टेस्टी फूड?... त्यांचं म्हणणं असतं, आरोग्य चांगलं राखायला आमची ना थोडीच आहे? पण हेल्दी फूड बेचव असतं. त्याला काहीच टेस्ट नसते. कारण आजवर सगळ्यांचा तोच समज आहे. हेल्दी फूड म्हणजे काहीतरी नुसतंच उकडलेलं, वाफवलेलं, कमी तिखटा-मिठाचं!.. अर्थातच त्या अन्नाला जर चवच नसली तर कोणीच त्याकडे फिरकणार नाही.
..पण हा आपला गैरसमज आहे किंवा त्याला जाणूनबुजून प्रसिद्धीही दिली गेलीय. हेल्दी फूड टेस्टीही असू शकतं. नव्हे, असतंच. अर्थातच तुम्ही ते कसं बनवता यावर सारं काही अवलंबून असतं. पण हेल्दी फूडला टेस्ट नसते, हे वर्षानुवर्षांपासून आपल्या डोक्यात बिंबवलं गेल्यामुळे अनेक जण त्यापासून दूर राहतात किंवा ते ट्राय करायलाही नकार देतात.
यासंदर्भात नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार तर सिद्ध झालं आहे की हेल्दी फूडच जास्त टेस्टी असतं. त्यामागचा नकारात्मक विचार आणि आपले पूर्वग्रह मात्र आपण सोडायला हवेत.
आहार या घटकाकडे जरी आपण थोडं बारकाईनं लक्ष दिलं तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतं. तुमचं आरोग्य सुधारतं. अनेक आजार तुम्ही तुमच्यापासून दूर राखू शकता. तुमची एनर्जी लेवलही त्यामुळे वाढते. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. वेटलॉससाठीचा तर तो महामंत्र आहे. त्यामुळे हेल्दी फूड टेस्टी नसतं या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून तुम्ही असा आहार सुरू तर करा, बघा काय फरक पडतो ते! आणि केवळ वाफवलेलं, उकडलेलं म्हणजेच ‘हेल्दी’, हे आपल्याला सांगितलं तरी कुणी? हेल्दी फूडही चमचमीत आणि हवेहवेसे असू शकतात. त्याची ‘टेस्ट’ मात्र आपण घ्यायला हवी.

Web Title: Who says, healthy food is not tasty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.