'या' कारणाने लहान मुलं खातात माती आणि खडू!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 10:18 AM2019-02-28T10:18:07+5:302019-02-28T10:21:33+5:30

अनेकदा असं पाहण्यात येतं की, काही लहान मुलं खडू, लेखन, माती, कागद इतकंच काय तर पेंटचे पोपळे देखील खाताना दिसतात.

Why do children eat dirt and chalk and how to treat it | 'या' कारणाने लहान मुलं खातात माती आणि खडू!

'या' कारणाने लहान मुलं खातात माती आणि खडू!

googlenewsNext

(Image Credit : UPMC HealthBeat)

अनेकदा असं पाहण्यात येतं की, काही लहान मुलं खडू, लेखण, माती, कागद इतकंच काय तर पेंटचे पोपळे देखील खाताना दिसतात. तुम्हीही कधी ना कधी बालपणी माती खाल्ली असणारच. पण याचं कारण काय आहे? का बालपणी माती, खडू, लेखण खाण्याची चटक अनेकांना लागते? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतोय. याला पीका (PICA)इटिंग डिसऑर्डर असं म्हणतात. हे नाव एका पक्ष्यावरून समोर आलं आहे. कारण हा पक्षी काहीही खाण्यासाठी लोकप्रिय आहे. ही इंटिंग डिसऑर्डर वेगळी असण्याचं कारण म्हणजे याने प्रभावित व्यक्ती अशा गोष्टी खातो, ज्यांना काहीही न्यूट्रिशन व्हॅल्यू नसतं. 

काय आहे कारण?

ही समस्या लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही असते. लहान मुलांमध्ये ही समस्या १ वर्षापासून ते ६ वर्षांपर्यंत बघायला मिळते. कारण लहान मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाला जाणून घेण्याची, समजून घेण्याची जिज्ञासा असते. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट तोंडात टाकून समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण जसजसे ते मोठे होतात, त्यांची ही सवय सुटत जाते. 

कुपोषण

एका वयानंतर सुद्धा ही सवय सुटत नसेल तर असं मानलं जातं की, शरीरात काही खास तत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी ते असं करत आहेत. त्यामुळे कुपोषण हे सुद्धा लहान मुलांमध्ये पीका असण्याची कारण मानलं जातं.  

ऑटिज्म

काही लहान मुलांमध्ये असं ऑटिज्ममुळे होतं. ऑटिज्मचा अर्थ या लहान मुलांचा मानसिक विकास व्यवस्थित होऊ शकला नाही.

डाएटने करा उपचार

जर ही स्थिती कुपोषणामुळे होत असेल तर सर्वातआधी टेस्ट करायला हवी की, लहान मुलाच्या शरीरात कोणत्या पोषक तत्त्वांची कमतरता आहे. जे पोषक तत्त्व त्या मुलाच्या शरीरात कमी असतील, ते डाएट किंवा औषधांच्या माध्यमातून त्याला दिले गेले पाहिजे. सामान्यपणे असे केले की, ही सवय सुटते. 

पण जर ही सवय ऑटिज्ममुळे असेल तर त्या मुलांना बिहेविअर थेरपीच्या माध्यमातून समजवायला पाहिजे की, या गोष्टी त्यांच्यासाठी हानिकारक आहेत. यातून त्या मुलांचं लक्ष या गोष्टींवरून दुसरीकडे भरकटवलं जातं. असं करून त्यांचं प्रोत्साहनही वाढवलं जातं. 

Web Title: Why do children eat dirt and chalk and how to treat it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.