थंड आणि दमट वातावरणात खोकला आणि शिंकाद्वारे तोंडातून निघणारे ड्रॉपलेट्स लांब अंतरापर्यंत जाऊ शकतात. गरम आणि शुष्क वातावरणात हे ड्रॉपलेट्स केवळ ६ ते ८ फूट अंतरापर्यंत जाऊ शकतात. पण तेच थंड आणि ओलावा असलेल्या वातावरणात हे ड्रॉपले्टस १३ फूटापेक्षा दूर जाऊ शकतात. मग भलेही हवा असो वा नसो..
खोकताना आणि शिंकताना श्वासांच्या माध्यमातून तोंडातून निघणारे ड्रॉपलेट्सवर वातावरणात झालेल्या बदलाला बघत अमेरिकेत करण्यात आलेल्या या रिसर्चचा मुख्य उद्देश वातावरणानुसार एखादा श्वासासंबंधी आजार पसरण्याची शक्यता जाणून घेणं हा होता. हा रिसर्च नुकताच 'Physics of Fluids' मध्ये प्रकाशित झाला. खास बाब ही आहे की,अमेरिकेत करण्यात आलेला हा रिसर्च भारतीय मूळाच्या वैज्ञानिकांनी केला.
(Image Credit : medscape.com)
हे अशाप्रकारचं पहिलं असं मॉडल आहे जे केमिकल रिअॅक्शनच्या कोलाइजन रेट थेअरीवर आधारित आहे आणि ड्रॉपलेट्सच्या प्रसाराची गति लक्षात ठेवून करण्यात आलाय. जेणेकरून या गोष्टीची योग्य माहिती मिळावी की, एखाद्या वातावरणात एका संक्रमित व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीपर्यंत या ड्रॉपलेट्सच्या प्रसाराचा वेळ आणि गति किती असते.
या रासायनिक प्रक्रियेचं मूळ या गोष्टीवर अवलंबून आहे की, दोन मॉलेक्यूल्स एकमेकांशी भिडल्यावर किती गतीने पुढे सरकतात. हे मॉलेक्यूल्स एकमेकांना जेवढ्या वेगाने भिडतील तेवढ्या वेगाने रिअॅक्शन मिळतील. ठिक त्याचप्रमाणे एका संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून निघालेल्या ड्रॉपलेट्सच्या संपर्कात जेवढे जास्त लोक येतील, संक्रमण तेवढं वेगाने पसरेल. हे मत रिसर्चचे लेखक आणि यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाशी संबंधित अभिषेक साहा यांचं आहे.
अभ्यासकांनी सांगितले की, संक्रमित व्यक्तीतून निघालेले ड्रॉपलेट्स किती अंतरापर्यंत जातील हे फार जास्त वातावरणावर अवलंबून आहे. संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून खोकताना किंवा शिंकताना निघालेले ड्रॉपलेट्स ८ ते १३ फूटांपर्यंत जाऊ शकतात. ड्रॉपलेट्सच्या या गतीला हवेच्या गतीसोबत जोडून पाहिलं गेलं. म्हणजे या ड्रॉपलेट्ससोबत जर हवा एक झाली तर यांचा प्रवास आणखी दूर होण्याची शक्यता आहे.
या रिसर्चमधून पुन्हा एकदा मास्कचं महत्व सिद्ध झालं आहे. म्हणजे जर निरोगी व्यक्तीने आणि संक्रमित व्यक्तीने दोघांनीही मास्क घातला नसेल तर सोशल डिस्टंसिंगचा कोणताही लाभ होणार नाही. कारण सोशल डिस्टंसिंगमध्येही व्यक्ती जास्तीत जास्त ४ ते ६ फूट अंतरापर्यंत उभे राहू शकत आहेत. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरणं किती गरजेचं आहे हे आपण समजू शकतो.
कोरोना विषाणूंच्या प्रसाराबाबत 'या' देशांतील संशोधकांचा धक्कादायक खुलासा; तज्ज्ञांनी सांगितलं की...
कोरोनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढवाल; आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' १० सोपे उपाय