सलूनमध्ये गेली होती महिला, घरी आली तर किडनीमध्ये झाली समस्या; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 12:46 PM2024-03-30T12:46:08+5:302024-03-30T12:46:37+5:30

एक महिला हेअरट्रीटमेंटसाठी गेली होती. पण जेव्हा परत आली तेव्हा तिच्या किडनीला नुकसान पोहोचलं होतं.

Woman left with kidney damage after visiting hair salon because of hair treatment chemicals | सलूनमध्ये गेली होती महिला, घरी आली तर किडनीमध्ये झाली समस्या; कारण...

सलूनमध्ये गेली होती महिला, घरी आली तर किडनीमध्ये झाली समस्या; कारण...

लोक सामान्यपणे हेअरकट करण्यासाठी सलूनमध्ये जातात. अनेकदा इथे केस जास्त किंवा कापल्यावरून वाद होतात. कारण कधी काही खराब प्रोडक्ट लावल्याने कुणाच्या केसांवर रिअॅक्शन होतात. पण नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे जी हैराण करणारी आहे. एक महिला हेअरट्रीटमेंटसाठी गेली होती. पण जेव्हा परत आली तेव्हा तिच्या किडनीला नुकसान पोहोचलं होतं.

26 वर्षीय ट्यूनेशियातील महिला सलूनमध्ये गेल्याने तिला किडनीमध्ये 3 इंजरी झाल्या. याच महिन्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका आर्टिकलनुसार,  फ्रान्सच्या डॉक्टरांनी संपादकांना लिहिलेल्या पत्रात केसांना मुलायम करणे आणि स्ट्रेट करणाऱ्या काही उत्पादनांना किडनी इंजरीसोबत जोडण्यात आलं होतं.

केस स्टडीमध्ये महिलेला आधी आरोग्यासंबंधी काही समस्या नव्हती. जेव्हा ती डॉक्टरांजवळ पोहोचली तेव्हा उलटी, ताप, जुलाब आणि पाठदुखी या समस्या होत्या. लेखात सांगण्यात आलं की, सीविअर किडनी इंजरी तिला त्याच दिवशी सलूनमध्ये हेअर ट्रीटमेंट दरम्यान झाली. महिलेने सांगितलं की, हेअर ट्रीटमेंटच्या प्रोसेस दरम्यान तिला जळजळ होत होती. ज्यानंतर तिच्या डोक्यात अल्सर झाला.

टेस्ट केल्यानंतर समजलं की, तिच्या रक्तात प्लाज्मा क्रिएटिनिनची लेव्हल वाढलेली होती. प्लाज्मा क्रिएटिनिन एक वेस्ट प्रोडक्ट आहे जे मांसपेशींमधून येतं. जेव्हा ते रक्तात मिक्स होतं तेव्हा किडनीद्वारे फिल्टर केलं जातं. जेव्हा महिला सलूनमध्ये गेली तेव्हा हेअर स्टायलिशने तिच्या केसांवर एक क्रीम लावली ज्यात 10 टक्के ग्लायऑक्सिलिक अॅसिड असतं. याच केमिकलने किडनीला नुकसान पोहोचलं.

डॉक्टरांकडून असा तर्क देण्यात आला की, 'ही परिणाम पुरावे आहेत की, ग्लायऑक्सिलिक अॅसिड हेअर स्ट्रेटनिंग क्रीमच यासाठी जबाबदार आहे.' 
2022 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिसर्चमध्ये सल्ला देण्यात आला होता की, केमिकलयुक्त हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सरचा धोका वाढू शकतो. 
 

Web Title: Woman left with kidney damage after visiting hair salon because of hair treatment chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.