आपल्या दिवसाची सुरुवात उशीराने करणाऱ्या महिलांच्या तुलनेत सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांमध्ये उशीरा उठणाऱ्या महिलांच्या तुलनेत स्तनाच्या कर्करोगाचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो. संशोधनातून असं समोर आलं आहे की, ज्या महिला 7 ते 8 तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना जास्त झोपलेल्या वेळेमधील प्रत्येक तासाच्या हिशोबाने 20 टक्के स्तनाच्या कर्करोगाचा धोका संभवतो.
स्तनाच्या कर्करोगाचा धोका
ब्रिटनमधील कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या संस्थेतील एक अभ्यासिका रेबेका रिचमॉड यांनी सांगितले की, या संशोधनातून सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांशी ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करणाऱ्या प्रभावांशी तुलना केली. ज्यामध्ये नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो असे अधोरेखित झालं आहे.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं :
- ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर स्तन किंवा काखेमध्ये सूज येते.
- स्तनाच्या निप्पल्समधून पाणी किंवा रक्त येऊ लागते.
- स्तनावर सूज किंवा लालसरपणा येतो.
- स्तनाच्या आकारातही फरक पडतो. जसं की, एकाचा आकार लहान तर एकाचा आकार मोठा दिसू लागतो.
- स्तनावर काही पूरळ येतात तर अल्सर तयार होतात. जे अनेक उपचार केल्यानंतरही ठिक होत नाहीत.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं ओळखण्यासाठी मॅमोग्राम ठरतं फायदेशीर
महिलांना मॅमोग्राम टेस्ट करणं गरजेचं असतं. मॅमोग्राम केल्याने स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं दोन ते पाच वर्षांमध्ये समजणं शक्य होतं. ज्या महिलांना अशी शंका असेल की, त्यांना काही अनुवंशिक कारणांमुळे स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. त्यांनी तपासण्या करण्याआधी जेनेटिक काउंसिलरकडून सल्ला घेणं गरजेचं असतं.
वेळीच ही लक्षणं लक्षात घेतली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले तर ब्रेस्ट कॅन्सरचा आजार ठिक होण्यास मदत होते. परंतु जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर मात्र अनेक गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर प्रत्येक महिन्याला योग्य त्या तपासण्या करणं फायदेशीर ठरतं.