(Image Credit : Irish News)
अनेकदा आपण पाहतो की, पुरूष हे नेहमीच स्त्रियांच्या बुद्धीबाबत नकारात्मक कमेंट करताना किंवा स्त्रिया स्लो असतात असं म्हणताना दिसतात. सतत त्यांना या गोष्टींवरून टोमणे मारले जातात. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून पुरुषांना गप्प करणारा निष्कर्ष समोर आला आहे. महिला आणि पुरूषांच्या बुद्धीबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. ज्यात त्यांनी दावा केला आहे की, महिलांचा बुद्धी त्यांच्या समवयस्क पुरूषांच्या तुलनेत तीन वर्ष अधिक तरूण असते. त्यामुळे महिलांची बुद्धी जास्त काळ तल्लख असते.
अमेरिकेतील वॉश्गिंटन विश्वविद्यालयाचे सहायक प्राध्यापक मनु गोयल म्हणाले की, आम्ही सध्या हे समजून घेणे सुरू केले आहे की, कशाप्रकारे वेगवेगळे लिंग बुद्धी वृद्ध होण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव करतात. ते म्हणाले की, मेंदूतील मेटाबॉलिज्म संबंधी क्रिया या महिला आणि पुरूषांचं वय वाढल्यावर त्यांच्या बुद्धी संबंधी फरक समजून घेण्यासाठी मदत करू शकतात.
हा अभ्यास 'प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस' जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यात अभ्यासकांनी २०५ लोकांवर अभ्यास केला आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, त्यांचा मेंदू शर्करेचा (sucrose) वापर कशाप्रकारे करतो. या अभ्यासात २० ते ८४ वयोगटातील १२१ महिला आणि ८४ पुरूषांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांच्या मेंदूतील ग्लूकोज आणि ऑक्सिजनचा प्रवाह मोजण्यासाठी त्यांचा पीईटी स्कॅन करण्यात आला. त्यानंतर त्यांनी वय आणि मेंदूच्या क्रियांमधील संबंध जाणून घेण्यासाठी एक मशीनमध्ये पुरूषांचं वय आणि मेंदूच्या क्रियांचा डेटा टाकला.
अभ्यासकांनी महिलांच्या मेंदूतील मेटाबॉलिज्म क्रियांचा डेटा मशीनमध्ये टाकला आणि आकडेवारीवरून महिलांच्या मेंदूच्या वयाची माहिती घेतली. यातून असे आढळले की, महिलांच्या वास्तविक वयापेक्षा त्यांची बुद्धीचं वय ३.८ वर्षाने तरूण होतं. याचप्रकारे पुरूषांच्या मेंदूचं वय जाणून घेण्यात आलं. पण हे वय पुरूषांच्या वास्तविक वयापेक्षा २.४ वर्षाने जास्त होतं. गोयल म्हणाले की, असे नाहीये की, पुरूषांचा मेंदू वेगाने वृद्ध होतो. ते बुद्धीच्या दृष्टीने महिलांपेक्षा तीन वर्षानंतर वयस्क होतात. म्हणजे पुरूषांच्या तुलनेत महिलांची बुद्धी तल्लख असते.