मुंबई : आज जगभरात World No Tobacco Day हा दिवस पाळला जातो. तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. तंबाखूमुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या विविध आजारांसोबतच हाडांचीही समस्या होते. अशा जर तुम्हाला तंबाखू सोडायचा असेल तर आणि त्यासाठी उपाय शोधत असाल तर खालीलप्रमाणे काही गोष्टींचा वापर करु शकता.
सकारात्मक रहा
तुम्ही जर दिवसभर तंबाखूचं सेवन करत असाल तर ही सवय मोडणे तुमच्यासाठी मोठं आव्हानच असणार आहे. अशावेळी तुम्ही सकारात्मक विचार करणे आणि मनाची तयारी करणे आवश्यक आहे. आपण हे करु शकतो अशी गाठ मनात बांधून ठेवा. स्वत:वर विश्वास ठेवा. अशात तुमच्या मनात अनेक चुकीचे विचार येणार आणि पुन्हा तुम्ही त्याच मार्गावर जाण्याचा प्रयत्न कराल अशावेळी स्वत:ला रोखण्याची तुमची परीक्षा असेल.
प्लॅन आखून काम करा
तंबाखूची सवय मोडण्यासाठी एक दिवस ठरवा. तंबाखू खाण्याचे नुकसान, त्याने काय होतं याबाबात जे वाचायला मिळेल ते वाचा. मनाची पूर्ण तयारी करा.
स्वत:ला बिझी ठेवा
तंबाखूची सवय मोडायची असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वत:ला कामात व्यस्त करुन घेणे. लोकांसोबत वेळ घालवा, सतत पाणी प्यायला हवे, टीव्ही बघा. हे सगळं करताना काही दिवस तुम्हाला त्रास होईल पण याने तुमचं मन डालव्हर्ट होईल आणि तुमची सवय मोडण्यास मदत होईल.
या गोष्टींपासूनही रहा दूर
त्या गोष्टींपासूनही दूर रहा ज्यामुळे तंबाखूचं सेवन करण्यास प्रोत्साहन मिळतं. कॉफी ब्रेक किंवा ड्राईव्ह करताना याची खास काळजी घ्या. घरातून तंबाखू बाहेर फेकून द्या. जे तंबाखू खाणारे लोक आहे त्यांच्यापासून दूर रहा.
हे ट्राय करा
तंबाखूचं व्यसन मोडण्यासाठी तुम्हाला तुमचं मन दुसऱ्या गोष्टीत लावावं लागेल. तुम्हाल जर तंबाखू खाण्याची तलब आली तर च्यूईंगम, ओवा खावा. याने तुम्हाला आलेली तबल त्या वेळेपुरती मारली जाते.