हृदयाचे कार्य झोपेतही सुरु असते. हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे त्यामुळे हृदय निरोगी ठेवणे खूप आवश्यक आहे. परंतु आपली बदलेली जीवनशैली, खाण्याची सवय आणि तणाव यासारख्या गोष्टींमुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत योगासने करून आपल्या हृदयाची काळजी घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तो म्हणजे योगा. चला जाणून घेऊया कि अशी कोणती योगासनं आहेत जी हृद्यासाठी आरोग्यवर्धक ठरतात.
पश्चिमोत्तानासन
1.आरामात बसा आणि आपले पाय समोर घ्या.
2.दोन्ही पाय जोडून घ्या.
3. आपले हात वरच्या बाजूस करा.
4. एक दीर्घ श्वास घ्या आणि मणके रुंद करायचा प्रयन्त करा.
5. आपण श्वास बाहेर टाकताच आपल्या हातांनी आपल्या पायांच्या बोटाला स्पर्श करा.
उत्थिता त्रिकोणासन
1. उभे रहा, आता आपला डावा पाय बाहेरील बाजूकडे वळवा आणि उजवा पाय थोडा आत करा.
2. पुढे जा आणि हात उंचावताना एक दीर्घ श्वास घ्या.
3. श्वास घ्या आणि आपल्या डाव्या हाताला शक्य तितके वाकवा.
4. हात आणि छाती सरळ रेषेत असावी.
5. आपल्या उजव्या हाताकडे पाहा आणि दोनदा-तीनदा श्वास घ्या.
सेतु बंधासन
1.आपले गुडघे वाकवा आणि पाय जमिनीवर ठेवा.
2. आपल्या हाताचे तळवे शरीराच्या दोन्ही बाजूने खाली टेकवा.
3. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू हात उंच करा.
4. आपली छाती उचलण्यासाठी जमिनीवर आपले हात आणि खांदे दाबून ठेवा. ४ ते ८ मिनिटे या स्थितीत रहा
अर्ध मत्स्येन्द्रासन
1. दोन्ही पाय पुढे करून जमिनीवर बसा.
2. आपले गुडघे वाकवून नंतर आपला उजवा गुडघा खाली टेकवा आणि उजवा पाय आपल्या डाव्या पायाजवळ आणा. आता आपल्या डाव्या घोट्याला आपल्या उजव्या पायाजवळ आणा.
3. आपला उजवा हात वरच्या दिशेने वर करा आणि आपला डावा हात मागे चटईवर ठेवा.
4. आता उजवा हात वर करा आणि डावीकडे वळताच डाव्या मांडीवर खाली दुमडा.
गोमुखासन
1. आरामात बसा आणि आपले गुडघे वाकवा.
2. आता आपला उजवा गुडघा थेट आपल्या डाव्या गुडघ्याच्या वर ठेवा.
3. आपला डावा हात मागे घ्या आणि आपले कोपर वाकवा. खांद्यांपर्यंत हात नेण्याचा प्रयत्न करा.
4. आता आपला उजवा हात वरच्या बाजूस हलवा, कोपर वाकवा आणि दोन्ही हातांच्या बोटांना जोडण्याचा प्रयत्न करा. कमीतकमी ३० सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.