सतत वजन कमी-जास्त होणे हृदयासाठी घातक, जाणून घ्या तथ्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 10:40 AM2018-10-19T10:40:32+5:302018-10-19T10:40:52+5:30
काही लोक डायटिंगच्या माध्यमातून आधी वजन कमी करतात आणि वजन कमी झाल्यावर पुन्हा आधीसारखं खायला लागतात. याने वजन पुन्हा वाढू लागतं.
सध्या वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या फिटनेस टिप्स आणि डाएट फॉलो करतात. काही लोक डायटिंगच्या माध्यमातून आधी वजन कमी करतात आणि वजन कमी झाल्यावर पुन्हा आधीसारखं खायला लागतात. याने वजन पुन्हा वाढू लागतं. अशाप्रकारे कधी वजन कमी तर कधी जास्त ही प्रक्रिया सुरु राहते.
काही लोक तर डायटिंगसाठी फारच कमी खातात. याप्रकारची डाएट फॉलो करण्यासाठी एक वाईट बातमी आहे. असे करणे आरोग्यासाठी फारच हानिकारक ठरु शकतं. एका शोधानुसार, ही बाब समोर आली आहे की, याने शरीरातील फॅट जेव्हा कमी होतात तेव्हा शरीराच्या मांसपेशींवर वाईट प्रभाव पडतो.
जेव्हा कुणी डायटिंग करत असतं तेव्हा शरीराचं मेटाबॉलिज्म अचानक कमी होतं. डायटिंगनंतर पुन्हा आधीसारखं खाणं-पिणं सुरु केल्यावर मेटाबॉलिज्म रेट असंतुलित होतो. हे शरीरासाठी फायदेशीर होण्याऐवजी नुकसानकारक ठरु शकतं.
हार्ट अटॅक आणि कॅन्सरचा धोका
ज्यांना हार्टसंबंधी काही समस्या असेल अशांसाठी हा प्रयोग फारच घातक होऊ शकतो. अशी डाएट करुन मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. एक्सपर्टनुसार, सामान्य व्यक्तींच्या वजनात जेव्हा अचानक वाढ आणि कमतरता येते तेव्हा त्यांना हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. काहींना तर कार्टिसोल हार्मोन्समध्ये बदल होण्याचाही धोका असतो. अशाप्रकारे पुन्हा पुन्हा वजन कमी-जास्त झाल्याने बायोलॉजिकल प्रक्रिया प्रभावित होते आणि कॅन्सरचा धोका वाढतो.
वजन कमी जास्त होणे धोक्याची घंटा
शोधानुसार, जे लोक वजन नेहमीच कमी-जास्त करत असतात, त्यांच्यात ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर लेव्हल अनियंत्रित होत राहतं. आणि या कारणानेच हार्ट अटॅक येऊ शकतो. शोधात असं आढळलं की, जे लोक आपल्या वजनावर ५ वर्ष कायम राहतात, त्यांच्या तुलनेत पुन्हा पुन्हा वजन कमी-जास्त करणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका १२७ टक्के जास्त असतो.
किती वजन कमी-जास्त होणं नसतं धोक्याचं?
या शोधातून याला खुलासा झाला आहे की, जे लोक डाएट करुन वजन कमी-जास्त करत असतात आणि कमी वेळातच त्यांचं वजन वाढतं, त्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. तसेच शोधातून हे समोर आले आहे की, १ किंवा २ किलो वजन कमी-जास्त झाल्याने कोणताही धोका नसतो.
अमेरिक कॉलेज ऑफ कायडियोलॉजी, नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटी फेनबर्ग स्कूल अॅन्ड मेडिसीन, अमेरिकन कॅन्सर सोसायटी यांनी यो यो डाएटवर अभ्यास केलाय.