कमी वयाच्या लोकांना होतोय 'या' प्रकारचा कॅन्सर, वेळीच व्हा सावध...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:48 PM2020-01-01T17:48:58+5:302020-01-01T17:50:33+5:30
आजारपण कोणतंही असो त्यात शरीराचं मोठं नुकसान होत असतं.
आजारपण कोणतंही असो त्यात शरीराचं मोठं नुकसान होत असतं. जसजसे वय वाढतं जातं तसतसं ते आजारपण जीवघेणं होण्याचा धोका नाकारता येत नाही. काही आजारपणं अशी असतात ज्यांच्याकडे तरूण वयात फारस लक्ष दिलं जात नाही. पण नंतर त्या समस्येचं रुपांतर मोठ्या आजारात होते. असाच एक आजार आहे तो म्हणजे पोटाचा कॅन्सर. या कॅन्सरबाबत एक धक्कादायक रिसर्च समोर आला आहे.
हा कॅन्सर झपाट्याने पसरतो. ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांमध्ये या प्रकारचा कॅन्सर आढळून येतो. या रिसर्चमध्ये समोर आलेल्या माहितीनूसार या प्रकारचा पोटाचा कॅन्सर इतर रोगांपेक्षा घातक असतो. या आजारावर केमिओथेरपीचा सुद्धा उपयोग होत नाही. मोठ्या वयोगटात कॅन्सर होत असताना आता मध्यम वयाच्या लोकांमध्ये सुद्धा या आजाराचे प्रमाण वाढत आहे.
जीवन संपवून टाकत असलेल्या कॅन्सर बद्दल खूप कमी लोकांना माहीती आहे. ऑन्कॉलॉजिस्ट सर्जन यांनी अनेकांनी आजाराकडे लक्ष न दिल्याचे सांगितले आहेत. सुरूवातीच्या काळात या प्रकारचा कॅन्सर झालेल्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे. सुरूवातीला या आजाराच्या लक्षणांना गांभीर्याने न घेतल्यामुळे हा आजार पसरत जातो.
रिचर्स करत असलेल्या तज्ञांच्या अहवालानूसार त्यांनी १९७३ ते २००५ या वर्षीच्या रिर्पोट्चा अभ्यास केला. त्यात कॅन्सरच्या आजारांने मृत्यू होत असलेल्यांची संख्या ७५ हजारांपेक्षा जास्त होती. ज्यात तरूणांच्या तुलनेने कॅन्सरचा आजार असलेल्या वृध्दांचे प्रमाण २ टक्क्यांनी कमी होते. हा रिसर्च जर्नल सर्जरी यात प्रकाशित करण्यात आला आहे. संधोधक अजून वेगवेगळ्या प्रकारे कॅन्सरचे मृत्यू होण्याची कारणं शोधत आहेत.