कळमनुरीत ८७५ जागेसाठी २०८२ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:43+5:302020-12-31T04:29:43+5:30

२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला अर्ज भरला नव्हता. ...

2082 applications filed for 875 seats in Kalamanuri | कळमनुरीत ८७५ जागेसाठी २०८२ अर्ज दाखल

कळमनुरीत ८७५ जागेसाठी २०८२ अर्ज दाखल

Next

२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला अर्ज भरला नव्हता. दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबर रोजी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबर रोजी १६७ तर २९ डिसेंबर रोजी ६२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत अर्ज भरता आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २०८२ अर्ज भरण्यात आले. यावेळी तहसील कार्यालय परिसरात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिनांकापासून आजपर्यंत एकूण २०८२ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये ऑनलाईनचाही खोडा निर्माण झाला होता. १०९ ग्रामपंचायतच्या ८७५ सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी एकूण २०८२ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.

Web Title: 2082 applications filed for 875 seats in Kalamanuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.