हिंगोली : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे २४९ रुग्ण आढळून आले. तर २५१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात २ मे रोजी रॅपिड अँटिजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. यामध्ये ९० पैकी १३ रुग्ण कोरोनाबाधित निघाले. यात हिंगोली परिसरात २५ पैकी ४, वसमत १४ पैकी ०, कळमनुरी १६ पैकी ३, सेनगाव २१ पैकी ०, औंढा परिसरात १६ पैकी ६ रुग्णांचा समावेश आहे. संशयितांची आरटीपीसीआर टेस्ट घेतली असता यात २३६ रुग्ण आढळून आले. हिंगोली परिसरात ६४ रुग्ण आढळून आले. वसमत येथे ४८, कळमनुरी ५२, सेनगाव ३६ तर औंढा परिसरात ३६ रुग्ण आढळले. रविवारी बरे झालेल्या २५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील ११२, लिंबाळा ९, वसमत ३४, कळमनुरी २४, औंढा ५४, सेनगाव येथील कोरोना केअर सेंटरमधील बऱ्या झालेल्या १८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १३ हजार १८७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ हजार ६०९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. आजघडीला १ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ४५९ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन सुरू असून ४२ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
आजपर्यंत २४३ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आजपर्यंत २४३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी हिंगोली आयसोलेशन वाॅर्डात उपचार घेणाऱ्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात अंजनवाडा येथील ६५ वर्षीय महिला, बासंबा येथील ७० वर्षीय पुरुष, सुकांडा (वाशीम) येथील ५५ वर्षीय पुरुष, उमरदरी येथील ४५ वर्षीय महिला रुग्णासह कळमनुरी कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या असोलवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.