आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ४५८ पैकी ५ बाधित आढळले. हिंगोली परिसरात ६३ व औंढ्यात ७१ जणांपैकी एकही बाधित नाही. वसमत परिसरात ११९ पैकी पांगरा शिंदे १, सेनगाव परिसरात ७९ पैकी उटी बु. १, गोरेगाव १ असे दोन बाधित आढळले. कळमनुरीत १२६ पैकी जांब १ व सालेगावात एक बाधित आढळला. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात बेलोरा ४, विवेकानंदनगर १, लिंबाळा १, एनटीसी १, बळसोंड १, पेडगाव १, पिंपळखुटा १, हिंगोली २, एसआरपीएफ १, टाकळी १, आदर्शनगर १, उटी पूर्णा १, आर.के.नगर १ असे १८ बाधित आढळले. कळमनुरी परिसरात असोलवाडी १, ग्रीन पार्क १ असे २ बाधित आढळले. औंढा परिसरात औंढा १ व लाख १ असे दोन बाधित आढळले. सेनगाव परिसरात सुलदली १, तळणी १ असे दोन बाधित आढळले. वसमत परिसरात स्वानंद कॉलनी १, कौठा १, कुरुंदा १, लोन २ असे पाच रुग्ण आढळले. तर बरे झाल्याने आज ४५ रुग्णांना डिस्चार्ज दिला. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून २६, कळमनुरी १, सेनगाव ४, लिंबाळा २, वसमत १० व औंढा येथून २ जणांना डिस्चार्ज दिला. आज कळमनुरी तालुक्यातील सालवाडी येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ७४४ रुग्ण झाले असून, त्यापैकी १५ हजार १०२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यात एकूण २७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ३६४ व्यक्तींचा मृत्यू झाला. सध्या दाखल रुग्णांपैकी ९६ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर १३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.