हिंगोलीत काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ४६० पोती गहू पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 01:17 PM2021-06-02T13:17:47+5:302021-06-02T13:20:05+5:30

Crime News in Hingoli रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात नेण्यासाठी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

460 bags of wheat on the black market were seized in Hingoli | हिंगोलीत काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ४६० पोती गहू पकडला

हिंगोलीत काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ४६० पोती गहू पकडला

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाईएकूण १७ लाख रुपयांचा ऐवज जप्त

हिंगोली : अकोला ते वाशिम मार्गावर रेशनच्या धान्याचे ४६० पोती घेवून जाणारा ट्रक पकडून स्थानिक गुन्हे शाखेने एकूण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यात परभणी जिल्ह्यातील दोन आरोपींना पकडले आहे.

रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात नेण्यासाठी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तपासणी केली. त्यात वाशिम जिल्ह्यातून हैदराबादाकडे जाणाऱ्या ट्रकची (क्र.एमएच-४६-एफ२२८६) तपासणी केली. पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याने ट्रकमध्ये गव्हाचे पोते असल्याचे सांगितले. संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ट्रक जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर गव्हाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता सदर गहू स्वस्त धान्य दुकानाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी ४६० पोती गहू व १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त केला. गव्हाची किंमत ५ लाख ७ हजार असल्याचे म्हटले. असा एकूण १७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रक चालक शेख अब्दुल्ला शेख हैदर, सय्यद अजिम सय्यद कलीम (दोघे रा. सोनपेठ, जि. परभणी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, ठोंबरे, भगवान आडे, आशिष उंबरकर, ठाकुर, पायघन, टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली. आता हा गहू वाशिममधील नेमका कोणाचा आहे, या काळाबाजारामागील सूत्रधार कोण? याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: 460 bags of wheat on the black market were seized in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.