शेवटच्या दिवशी ४९ जणांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:03 AM2018-12-19T00:03:31+5:302018-12-19T00:03:52+5:30
कळमनुरी/आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी/आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली.
१८ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस होता. या एकाच दिवशी ४९ तर आतापर्यंत ७४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. १८ संचालक पदासाठी निवडणूक होत आहे. यात ५१ हजार ८१ मतदार हक्क बजावणार आहेत. १८ डिसेंबर रोजी उमेदवारी भरण्यास चांगलीच गर्दी झाली होती.
यामध्ये शेतकरी मतदारसंघात कांडली- रुपेश रमेश देशमुख, घोडा- पंजाबराव दादाराव पतंगे, वारंगा फाटा- संतोष किसन राजेगोरे शेवाळा- संदीप मारोतराव सावंत, लाख- मंदाबाई बापूराव लोंढे, डोंगरकडा- सविता विजय गावंडे, जवळा पांचाळ- मारोतराव चांदोजी पवार, धनाजी मारोती पवार, डोंगरकडा- अनुसयाबाई व्यंकटराव अडकिणे, अनूसयाबाई नरवाडे, जवळा पांचाळ- सुनील गोविंद लांडे, वारंगा फाटा- सुनील सुभाष लोमटे, जवळा पांचाळ-शिवाजी बाबूराव सवंडकर, डोंगरकडा- शेख आखेफुनिसा शे. मो. इसा, डोंगरकडा- सुमनबाई गोपाळराव वीर, राधाबाई कोंडबा अडकिणे, मीराबाई श्यामराव अडकिणे, घोडा-काशीराव ग्यानबाराव पतंगे, कोथळज- धुरपत नारायण पाईकराव, जलालदाबा- गणेश किसन लोंढे, कांडली- किसन सटवाराव कोकरे, नांदापूर- गजानन परशराम चव्हाण, आखाडा बाळापूर- दत्ता संजय बोंढारे, जवळा पांचाळ- एकनाथ मारोतराव पुंड, जलालदाभा-विठ्ठल उत्तम पोले, लाख- कावेराबाई बबन सावळे, शेवाळा- शिवाजी कोंडबाराव चव्हाण, पिंपळदरी- बालाजी नारायण वानखेडे, डोंगरकडा- मीराबाई श्यामराव अडकिणे, आखाडा बाळापूर- रावजी संभाजी बोंढारे, नांदापूर गजानन माणिकराव काळे, सिंदगी- अनिल जानकीराम रणखांब, कांडली राहुल रमेश पतंगे, कोथळज- यादव भिकाजी पाईकराव, सिंदगी- शिरीष मधुकरआप्पा कंझाडे, न् ाांदापूर-वसंत वामन देशमुख, लाख-कुसुमबाई माणिकराव लोंढे, कोथळज-छायाबाई शकुराव शेळके, खोब्राजी संभाजी भुक्तर, पोठवडगाव- माणिक साहेबराव दुर्गे, आखाडा बाळापूर- रावजी संभाजी बोंढारे, शेवाळा- अमर रामराव सावंत, सिंदगी-साहेबराव लक्ष्मण मंदाडे यांचा समावेश आहे.
कळमनुरी : तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आठ पथके तयार केली आहेत.
वाहन परवाना देणे निवडणूक साहित्याची मागणी व नियोजन करणे, मतपत्रिका छपाई व त्याबाबत हिशोब ठेवणे, प्रशिक्षण व्यवस्था बैठक, व्यवस्था स्ट्राँग रुम व्यवस्थापन , नियंत्रण पथक वाहन, व्यवस्थापन पथक, वाहतूक आराखडा तयार करणे, ओळखपत्र तयार करणे, मतदान केंद्रनिहाय मतदार कार्यप्रति तयार करणे, यासाठी आठ पथके तयार केली.
व्यापारी मतदारसंघातून बालासाहेब मनोजीराव गावंडे, नंदकुमार लक्ष्मण लासे, मारोतराव बापूराव शिंदे यांनी अर्ज भरला.हमाल मापाडी मतदारसंघातही शेवटच्या दिवशी माधव सदाशिव कळमूळकर, शेख मो. गौस मो.रज्जाक या दोघांनी अर्ज भरला.