शेतकऱ्यांना ५१ कोटींचा मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:20 AM2019-03-12T00:20:56+5:302019-03-12T00:21:12+5:30

हिंगोली-नांदेड या राष्टÑीय महामार्गाचे रूंदीकरण व कळमनुरी-आखाडा बाळापूर येथे बायपास होत आहे. महामार्गात जाणाऱ्या जमिनी व मालमत्तेचे मूल्यांकण करण्यात आले असून आतापर्यंत ३३० शेतकऱ्यांना ५१ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे.

 51 crores of compensation to the farmers | शेतकऱ्यांना ५१ कोटींचा मोबदला

शेतकऱ्यांना ५१ कोटींचा मोबदला

googlenewsNext

इलियास शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली-नांदेड या राष्टÑीय महामार्गाचे रूंदीकरण व कळमनुरी-आखाडा बाळापूर येथे बायपास होत आहे. महामार्गात जाणाऱ्या जमिनी व मालमत्तेचे मूल्यांकण करण्यात आले असून आतापर्यंत ३३० शेतकऱ्यांना ५१ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे.
शेतकºयांना मावेजा देण्यासाठी राष्टÑीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांच्याकडे २०४ कोटींची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी १४९ कोटी उपविभागीय कार्यालयाकडे आले आहेत. त्यापैकी ५१ कोटींचे वाटप शेतकºयांना करण्यात आले आहे. तालुक्यातील कळमनुरी, वसपांगरा, शिवणी खुर्द, देवघरी, माळेगाव, घोळवा, साळवा, देवधरी, जरोडा, उमरा, येलकी, कामठा, डोंगरगावपूल, आ.बाळापूर, शेवाळा, पिंपरी खुर्द, पाळोदी, आराटी, दाती, वारंगाफाटा, नरवाडी, कुंभारवाडी या २१ गावातील शेतकºयांच्या जमिनी राष्टÑीय महामार्गात जात आहेत. १६७ हेक्टर जमिन राष्टÑीय महामार्गात व रूंदीकरणात जात आहे. त्यापैकी ११२ हेक्टरचे निवाडे झाले आहेत. ३३० शेतकºयांच्या बँक खात्यावर ५१ कोटींचा मावेजा जमा करण्यात आला आहे. २१ गावांतील सर्व जमिनी मालमत्ता यांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, वनविभाग आदी विभागाकडून करण्यात आली आहे. जमीन, विहीर, बोअर, फळझाडे, वनझाडे, पाईपलाईन बांधकाम आदींचे मूल्यांकन करण्यात आले आहे. वसपांगरा, उमरा, कुंभारवाडी, दात्ती, घोळवा, शेवाळा, येलकी, जरोडा, पाळोदी, साळवा, देवधरी, डोंगरगावपूल या गावातील ३३० शेतकºयांना ५१ कोटींचा मावेजा देण्यात आला आहे.
मावेजाचे वाटप करण्यात येत आहे. नरवाडी व शिवणी खुर्द येथील निवाडे बाकी असल्याचेही सांगण्यात आले.
या महिन्याअखेर २१ गावांतील सर्व शेतकºयांना मोबदला वाटप करण्यात येणार आहे. किमान ८० टक्के रक्कम वाटप होण्याची शक्यता मावेजा वाटपाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या जमीन मालमत्तेत वाद नाहीत, कागदपत्र बरोबर आहेत, अशा सर्व शेतकºयांना मार्चअखेर मोबदला वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आल्याची माहिती कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जमिनीचे मोजमाप भूमी अभिलेख कार्यालयाने केले आहे. शेतकºयांना मावेजाची रक्कम मिळाल्यानंतर राष्टÑीय महामार्ग १६१ च्या रूंदीकरण व कळमनुरी-आखाडा बाळापूरसाठी बायपासच्या कामाला सुरूवात होणार आहे.

Web Title:  51 crores of compensation to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.