हिंगोली: गरीबांचा दवाखाना म्हणून जिल्हा रुग्णालयाची ओळख आहे. रुग्णालयात सद्य:स्थितीत ५७ बेड असून, कोरोना काळात सॅनिटायझरचे वॉर्ड साफ करायला पाहिजे, परंतु,तसे काहीच होताना दिसून येत नाही.विशेष म्हणजे बहुतांशवेळा ठरवून दिलेल्या राऊंडलाही डॉक्टर मंडळी येत नाहीत, अशा तक्रारीही महिलांनी केल्या.
मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण दोन आकड्यांनी वाढले आहेत. असे असताना बाळंतपणासाठी आलेल्या महिलांच्या वॉर्डात स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. परंतु, वॉर्डाच्या बाहेरच चपलांचे ढीग पहायला मिळत आहेत. डिलेव्हरी विभागात महिला व्यतिरिक्त कोणीही जायला नाही पाहिजे. परंतु, इथे सर्रासपणे इतर पुरुष जात आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने संबंधित विभागाच्या डॉक्टर मंडळींनी बाळ व त्याच्या आईची काळजी घ्यायला पाहिजे. जिल्हा रुग्णालयात एक्सरे विभाग, अपघात विभाग, अस्थिरोग विभाग, कान-नाक-घसा विभाग, नेत्र चिकित्सा विभाग, इंजेक्शन विभाग अनेक विभाग आहेत. यात डिलेव्हरी विभाग हा महत्वाचा आहे. विशेष करुन या विभागाकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु, इकडेच प्रशानाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
रुग्णांना भेटण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने सकाळी ११ ते दुपारी २ आणि सायंकाळी ६ ते ७ अशी वेळ दिली आहे.परंतु कोणत्याही वेळात नातेवाईक येवून भेटू लागले आहेत.
पूर्ण सुविधा नाहीत
गरीबांचा दवाखाना म्हणून ख्याती आहे. परंतु, म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. काही ठिकाणी फाटलेले आहेत. हात धुण्यासाठी हँडवाॅश नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सॅनिटायझरचा पत्ताही नाही. नातेवाईक बिनधास्तपणे बाळंतकक्षात येत आहेत. ये-जा करणाऱ्यांना आवर घालणे गरजेचे आहे.
डॉक्टरांचा वेळेवर राऊंड होतो का?
राऊंड आहे म्हणून डॉक्टर वेळेवर येतात. परंतु, डिलेव्हरी वॉर्डात मात्र येत नाही. विचारणा केल्यास चिठ्ठी दिली आहे, डॉक्टर आल्यावर सांगा, असे परिचारिका सांगतात.
राऊंडला आल्यानंतर मुख्य डॉक्टरांनी प्रत्येक बाळंत महिलेची विचारपूस करणे गरजेचे आहे. परंतु, विचारपूस होत नाही, असे महिलांनी सांगितले.
गत दोन-चार दिवसांपासून सॅनिटायझरची मागणी केली आहे. परंतु, अजून तरी सॅनिटायझर उपलब्ध करुन दिले नाही. आम्ही साबनाने हात धुत आहोत.
जिल्हा रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिलांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. कोणतीही उणीव त्यात ठेवली जात नाही. जो कोणी यात हलगर्जीपणा करेल त्यास सूचना देवून त्यावर कार्यवाही केली जाईल. कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोणीही महिला वॉर्डात जावू नये, अशा सूचनाही सर्वांना दिल्या आहेत.
-डॉ. मंगेश टेहरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक