७४ उमेदवारी अर्जांची छाननी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:26 AM2018-12-20T00:26:14+5:302018-12-20T00:26:31+5:30
तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १९ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.
२० डिसेंबर रोजी अवैध ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले. येथील तहसील कार्यालयात १९ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलासचंद्र वाघमारे, सहाय्यक निबंधक बोलके यांनी ७४ उमेदवारी अर्जाची छाननी केली. आखाडा बाळापूर बाजार समितीच्या मतदार संघात १५ गण आहेत. या १५ गणात व्यापारी, हमाल, मापाडीसह ७४ उमेदवारी अर्ज आले आहेत. व्यापारी संचालकासाठी- ७, हमाल, मापाडी संचालकासाठी- ३ तर शेतकरी संचालकासाठी ६४ उमेदवारी अर्ज आले आहेत.
१८ संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे. यात ५१ हजार ८१ मतदार आहेत. १३ जानेवारी रोजी ७६ मतदान केंद्रावर मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.
रणखांब बिनविरोध?
दरम्यान, सिंदगी गणात एकमेव अनिल रणखांब यांचाच अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिल्याचे सांगितले जात असून ते बिनविरोध निघाल्याने सत्काराचे कार्यक्रमही होत आहेत. प्रशासनाने मात्र अधिकृतरीत्या काहीच सांगितले नाही. रणखांब हे काँग्रेस-राकाँ आघाडीचे आहेत.
डोंगरकडा गणात सर्वाधिक अर्ज ...
आखाडा बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापुर ची निवडणूक आता जोरदार रंगात आली आहे. शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण ७४ उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पुढे आले आहे. यामध्ये सर्वाधिक रस्सीखेच डोंगरकडा गणात असून डोंगरकडा गणासाठी आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर त्याखालोखाल जवळा पांचाळ गणात सात, आखाडा बाळापूर गणासाठी ५ , शेवाळा गणासाठी ५, घोडा गण ४, कांडली गण पाच, वारंगा फाटा ४ ,डोंगरकडा ८, जवळा पांचाळ ७, दांडेगाव २, पेठवडगाव ३, सिंदगी ५, नांदापूर ४, पिंपळदरी २, जलालदाभा २, लाख २, कोथळज ५ तर व्यापारी गणासाठी ७ हमाल मापाडी गणासाठी ३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.