जलजीवन योजनेत ९५ हजार घरांना मिळणार नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:40 AM2021-02-27T04:40:50+5:302021-02-27T04:40:50+5:30

हिंगोली जिल्ह्यात १०१ गावांमध्ये सध्या नळयोजना सुरू असून यात २४ हजार ९२ पैकी ११३८४ घरांना नळजोडणी नाही. त्यामुळे एवढ्या ...

95,000 houses will get plumbing in Jaljivan Yojana | जलजीवन योजनेत ९५ हजार घरांना मिळणार नळजोडणी

जलजीवन योजनेत ९५ हजार घरांना मिळणार नळजोडणी

googlenewsNext

हिंगोली जिल्ह्यात १०१ गावांमध्ये सध्या नळयोजना सुरू असून यात २४ हजार ९२ पैकी ११३८४ घरांना नळजोडणी नाही. त्यामुळे एवढ्या नळजोडण्याच द्यावयाच्या असून ही कामे वित्त आयोगाच्या टाईड निधीतून करायची आहेत. यासाठी ३.४८ कोटी रुपये लागणार आहेत. याशिवाय जिल्ह्यात १५३ नळयोजना असून त्या दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसल्याने वाढीव कामे करावी लागतील. यात ३९ हजार ८४५ पैकी २१ हजार ४७६ घरांना नळजोडण्या द्याव्या लागतील. यासाठी २४.७७ कोटी लागतील. यापैकी ४.८४ कोटी पंधराव्या वित्त आयोगाच्या टाईड निधीतून तर १९.९२ कोटी जलजीवन मिशनमधून मागणी केली आहे. नव्याने ३३९ गावांत नळयोजना प्रस्तावित केली आहे. यामध्ये ८३ हजार १३१ पैकी ४८ हजार २७९ घरांना नळजोडणी द्यावी लागणार आहे. यात अनेक ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजनाच सुरू करावी लागणार आहे. यात सर्वाधिक २८९.९८ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. या निधीची मागणी जलजीवनकडे करण्यात आली आहे. तर सहा गावांसाठी एक प्रादेशिक योजना प्रस्तावित केली असून यात १५४६ घरांना नळजोडणी द्यावी लागणार आहे. यात ७.२८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वरील सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी ३५९.६४ कोटी रुपयांचा खर्च येणार असून शासन एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल का? हा मोठा प्रश्न आहे.

३२ गावांना नळयोजनाच नाही

जिल्ह्यातील ३२ गावांत कोणतीच नळयोजना नाही. अशा गावांतील ३५२६ घरांना योजनेसह नळजोडणी देण्यासाठी २४.२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या गावांना ही योजना मंजूर झाली तर पहिल्यांदाच नळयोजनेचे पाणी मिळणार आहे. शिवाय प्रादेशिक योजनेतील सहा गावांचीही तीच परिस्थिती राहणार आहे.

तालुकानिहाय प्रस्तावित नवीन योजना

तालुका गावांची संख्या शिल्लक कुटुंबे अपेक्षित निधी

औंढा ५२ ९९०४ ३८६५

वसमत १०१ ८२५७ ८४८०

हिंगोली ७८ ८९८३ ६७८४

कळमनुरी ४० १३३९१ ३००८

सेनगाव ६८ ७७४४ ६८६०

एकूण ३३९ ४८२७९ २८९९८

Web Title: 95,000 houses will get plumbing in Jaljivan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.