मुरूंबा शिवारातील जुगारअड्ड्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:45+5:302021-08-15T04:30:45+5:30

हिंगोली : वसमत तालुक्यातील मुरूंबा शिवारातील एका जुगारअड्ड्यावर १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यावेळी ...

Action on gambling den in Murumba Shivara | मुरूंबा शिवारातील जुगारअड्ड्यावर कारवाई

मुरूंबा शिवारातील जुगारअड्ड्यावर कारवाई

Next

हिंगोली : वसमत तालुक्यातील मुरूंबा शिवारातील एका जुगारअड्ड्यावर १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी १० जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून २ लाख ५९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वसमत तालुक्यातील मुरूंबा शिवारात झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या पथकाने छापा टाकला असता १० जण झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी, तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ५९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या फिर्यादीवरून गोविंद बालाजी खारोडे (रा. मुरूंबा), पिंटू भिवाजी गायकवाड (रा. बोरगाव), पाराजी सटवाजी बोखारे (रा. इंजनगाव पूर्व), गंगाराम दुर्गाजी निर्मळे (रा. इंजनगाव पूर्व), गजानन संभाजी लडके (रा. माळवटा), गंगाधर उत्तमराव सपकाळ (रा. पळसगाव), व्यंकटी गंगाराम अडकिणे (रा. इंजनगाव पूर्व), गंगाधर केरबा नादरे (रा. माळवटा), परमानंद नारायण कुबडे (रा. खांडेगाव), गणपत विश्वनाथ वाकळे (रा. खांडेगाव) यांच्याविरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गु्न्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस हेड वाय. जी. वाघमारे करीत आहेत.

Web Title: Action on gambling den in Murumba Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.