‘वैधमापन’ची कारवाई थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:23 AM2018-12-03T00:23:11+5:302018-12-03T00:24:27+5:30
वैधमापन शास्त्र विभागातर्फे मापात पाप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कार्यक्षेत्रात असणाºया ठिकाणी जागो-जागी कॅम्प भरवून वजने, मापे काट्यांची पडताळणी केली जाते. मात्र हिंगोलीत ही मोहीम थंडावली असून पडताळणीचा लेखा-जोखाही कार्यालयात उपलब्ध नाही. वैधमापन निरीक्षक यांच्याकडे परभणी येथील पदभार आहे. कामाचा व्याप पाहता इतर कामांचा खोळंबा होत आहे.
दयाशील इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली: वैधमापन शास्त्र विभागातर्फे मापात पाप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कार्यक्षेत्रात असणा-या ठिकाणी जागो-जागी कॅम्प भरवून वजने, मापे काट्यांची पडताळणी केली जाते. मात्र हिंगोलीत ही मोहीम थंडावली असून पडताळणीचा लेखा-जोखाही कार्यालयात उपलब्ध नाही. वैधमापन निरीक्षक यांच्याकडे परभणी येथील पदभार आहे. कामाचा व्याप पाहता इतर कामांचा खोळंबा होत आहे.
वैधमापन विभागातर्फे वजने, मापे व काट्यांची अचानक तपासणी केली जाते. यावेळी दोषी व्यापारी किंवा दुकानचालकाविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येते. ग्राहक संरक्षणाच्या दृष्टितून हा विभाग अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु मागील पाच ते सहा महिन्यांपासून कार्यालयातील कारभार ढेपाळल्याचे चित्र आहे. वैधमापन निरीक्षक यांच्याकडे हिंगोली व परभणी या दोन जिल्ह्यांचा कार्यभार आहे. परंतु विभागातील अपुरे मनुष्यबळ आणि त्यात दोन जिल्ह्यांतील कामाचा व्याप पाहाता कारवाईच्या केसेस कमी होत चालल्या आहेत. यापूर्वी हिंगोली येथील वैधमापन कार्यालयात पूर्णवेळ वैधमापन निरीक्षक कार्यरत होते. त्यामुळे कारवाईचा आकडाही मोठा होता. परंतु सध्या कार्यरत असलेल्या वैधमापन निरीक्षकाकडे दोन जिल्ह्याचा कारभार असल्यामुळे कार्यालयास आठवड्यातून एकदा त्यांची भेट असते. परिणामी कार्यालयीन कामांचाही खोळंबा होत आहे. कार्यालयात केवळ सेवकच हजर असतो. त्यामुळे वैधमापन शास्त्र विभागास पुर्णवेळ अधिकाºयाची आवश्यकता आहे. जेणेकरून ग्राहकांची होणाºया लुटीवर नियंत्रण आणण्यास मदत होईल. व मापात पाप करणाºया दोषींवर कारवाई.
मापात पाप करणाºयांना मिळतेय बळ
जिल्ह्यात वजने व मापांची अचानकपणे तपासणी करण्यात येते. तत्पूर्वी नोंदणीकृत व्यापाºयांना त्यांच्या मापांची तपासणी करून घ्यावी लागते. त्यासाठी या विभागाकडून स्वतंत्र कॅम्प आयोजित करण्यात येतात. परंतु बहूतांश व्यापारी त्याला प्रतिसाद देत नाहीत. अशा व्यापाºयांवर विभागातर्फे कारवाई केली जाते. ग्राहक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हिंगोली येथील वैधमापन शास्त्र विभागास पूर्णवेळ अधिकाºयाची आवश्यकता आहे. जेणेकरून मापात पाप करून ग्राहकांची लूट करणाºया दोषींविरूद्ध कारवाई होईल.
पेट्रोलपंपावर अनेकदा कमी पेट्रोल टाकले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेकदा या कारणावरून वादही होतात. परंतु संबंधितांविरूद्ध या विभागातर्फे मात्र कारवाई होत नाही, हे विशेष.