हिंगोलीतील टपरीवर अजित पवारांनी प्यायली कॉफी, चहावाल्याशी मारल्या गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 03:04 PM2018-01-22T15:04:08+5:302018-01-22T15:05:22+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा आज सातवा दिवस आहे.

ajit pawar talk with common tea seller in hingoli | हिंगोलीतील टपरीवर अजित पवारांनी प्यायली कॉफी, चहावाल्याशी मारल्या गप्पा

हिंगोलीतील टपरीवर अजित पवारांनी प्यायली कॉफी, चहावाल्याशी मारल्या गप्पा

Next

हिंगोली- राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा आज सातवा दिवस आहे. माहूर येथे रविवारी सभा झाल्यानंतर आज हिंगोली येथील सभेला हल्लाबोल यात्रा निघाली होती. यावेळी घडलेला एक किस्सा सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतो आहे. 
हल्लाबोल यात्रेसाठी अजित पवार आपल्या गाडीतून हिंगोलीकडे निघाले होते. प्रवासादरम्यान अजित पवार यांना अचानक कॉफीची तल्लफ लागली. यावेळी अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा शहरापासून दूर माळेगाव फाटा परिसरात होता. याठिकाणी रस्त्यावर कुठेच चांगलं हॉटेल दिसत नव्हतं. त्यामुळे गाडीच्या चालकाने कुठेतरी एखादे चांगले हॉटेल बघून गाडी थांबवतो, असे सांगितलं. पण, अजित पवार यांनी कोणताही अनमान न बाळगता कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथील एका टपरीवर जाऊन कॉफीची तल्लफ भागवली. 

अजित पवार कॉफी पिण्यासाठी टपरीवर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. कॉफी तयार होईपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी गप्पाही मारल्या. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळतं असं विचारल्यावर इथे भजी आणि खिचडी फेमस असल्याचं चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम गरम भज्यांचाही दादांनी यावेळी आस्वाद घेतला.

 

Web Title: ajit pawar talk with common tea seller in hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.