अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:29 AM2018-12-15T00:29:32+5:302018-12-15T00:29:51+5:30
शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार आनंदनगर अकोला बायपास येथे १६ डिसेंबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भंन्ते धम्मदीप यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार आनंदनगर अकोला बायपास येथे १६ डिसेंबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भंन्ते धम्मदीप यांनी केले आहे.
शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार संयोजन समिती व ज्ञानसागर महिला मंडळाच्या वतीने भंन्ते सुमेधबोधी महाथेरो यांच्या उपसंपदेला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुमेध बोधी यांची नाणेतुला व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेनिमित्त सुमेधबोधी महाथेरो, विनयबोधी महाथेरो, भंते प्रज्ञाबोधी महाथेरो, भंते धम्मदीप आदीसह राज्यातील विविध ठीकाणाहून येणारे भंन्तेजी धम्मदेसना देणार आहेत. तसेच शास्त्रज्ञ सिद्धार्थ जोंधळे यांचे व्याख्यान होणार असून शाहीर सूर्यकांत भगत व दिनकर लोणकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. ध्वजारोहण, परित्राणपाठ, विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भंते धम्मदीप, भंते एस. राहुल, भंते प्रज्ञाघोष, भंते डॉ. हर्षबोधी, भंते शाक्यपुत्र ज्ञानसागर तसेच महिला मंडळ व संयोजक समितीने केले आहे.