औरंगाबाद, अमरावती, अकोला,भुसावळ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:14 PM2018-01-12T23:14:28+5:302018-01-12T23:14:30+5:30

येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्व.बलभद्र कयाल स्मृतिचषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत दुसºया दिवशी अकोला, भुसावळ, औरंगाबाद व अमरावती संघांनी बाजी मारली.

 Aurangabad, Amravati, Akola, Bhusawal won | औरंगाबाद, अमरावती, अकोला,भुसावळ विजयी

औरंगाबाद, अमरावती, अकोला,भुसावळ विजयी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्व.बलभद्र कयाल स्मृतिचषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत दुसºया दिवशी अकोला, भुसावळ, औरंगाबाद व अमरावती संघांनी बाजी मारली.
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा पहिला सामना रावत रेजर्स हिंगणघाट विरूद्ध जिल्हा असो. अकोला यांच्यात झाला. यात दोन विरूद्ध एक गोलच्या फरकाने हिंगणघाटला पराभव स्वीकारावा लागला. हिंगणघाटचा कर्णधार सुरज रावत यास सर्वोत्कृष्ट खेळाडुचा मान मिळाला. खालसा सचखंड नांदेड विरुद्ध सेंट्रल रेल्वे भुसावळ हा सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. बरोबरीत सुटलेला सामना सडन डेथ या प्रकारात ५ विरूद्ध ६ या फरकाने भुसावळने जिंकला. परंतु सचखंडच्या खेळाडूंनीही प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यात नांदेडच्या सत्यजीत सिंग यास मॅन आॅफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला.
साई औरंगाबाद विरुद्ध नागपूर अ‍ॅकडमी नागपूर हा सामना एकतर्फी झाला. साई औरंगाबादने तो ४ विरुद्ध 0 या फरकाने जिंकला. नागपूरचा चांगला खेळाडू शैफुद्दीन यास उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान दिला. क्लासिक वर्धा व यंगस्टार अमरावती यांच्यातील लढतीत वर्धा संघास ६ विरूद्ध ० गोल अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. वर्ध्याच्या नवाबखॉ यांना मॅन आॅफ द मॅच देण्यात आला.

Web Title:  Aurangabad, Amravati, Akola, Bhusawal won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.