बसवेश्वर म्हणजे प्रेरणा देणारा झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:36 AM2018-04-24T00:36:57+5:302018-04-24T00:36:57+5:30
येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना व कर्मचारी महासंघ तथा बसवप्रेमी व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने २२ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या ८८७ व्या जयंती निमित्ताने महावीर भवन येथे व्याख्यामालेचे आयोजन केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना व कर्मचारी महासंघ तथा बसवप्रेमी व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने २२ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या ८८७ व्या जयंती निमित्ताने महावीर भवन येथे व्याख्यामालेचे आयोजन केले होते.
अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रा.किशनराव इमडे, अर्जून सैदाने, धन्यकुमार शिवणकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून पुणे येथील उमाकांत शेट्टे होते. यावेळी शेट्टे म्हणाले, म.बसवेश्वर हे १२ व्या शतकातील मानवतावादी समाज सुधारक, महामानव असून त्यांचे विचार सर्वधर्मिय लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. समतेचा संदेश देणारे म. बसवेश्वर लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे विचार, तत्त्वज्ञान लोकशाहीला आधार आहे, समाजाने यांच्या विचारासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी बहुजनांचे उद्धारक, म. बसवेश्वर समतेचा संदेश देऊन त्यांचे विचार सामान्य तळागाळातील, सर्वधर्मिय समाजापर्यंत पोहोचविण्यास वेळ आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक व्याख्यानमालेचे आयोजन करून आपण अभिनंदनीय काम केले. अध्यक्षीय समारोपात धोंडे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे विचार मांडले. तर शिवा संघटनेने पाठपुरावा करून शासनाकडून ज्या मागण्या मान्य करून घेतल्या, त्याबद्दल समाज बांधवांनी माहिती दिली. तर समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवा संघटनेबद्दल आस्था असणे आवश्यक आहे, असे सांगितले. प्रास्ताविक सुभाष जिरवणकर यांनी केले. त्यामध्ये शिवा संघटना ही विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना नेहमी साथ देणारी संघटना आहे. सूत्रसंचालन प्रा. जयप्रकाश पाटील यांनी तर आभार संजय मेथेकर यांनी मानले.
यशस्वीतेसाठी शिवशरण रटकलकर, सुरेशआप्पा घळे, सुभाष जिरवणकर, महेश आप्पा जैनापुरे, रमेश आढळकर, मन्मथ दरगू, वसंतराव शिंदे, गंगाधर मुपकलवार, विशाल गोटरे, सदाशिव सराफ, महादेव राऊत, गजानन तायडे, बाळूआप्पा टाले, ज्ञानेश्वर उन्हाळे, संजय दुबळगुंडे, बाळू फंदे, रघुनाथ मिटकरी, राजेश खके, प्रशांत तुपकरी, संजय मेथेकर, शिवानंद होकर्णे, संतोष काळे यासह पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.