लोकमतच्या रक्तदान शिबिरात ५४ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:43+5:302021-07-03T04:19:43+5:30
हिंगोली : लाेकमत रक्ताचं नातं या मोहिमेत राज्यभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत हिंगोली येथेही २ जुलै रोजी महावीर भवन येथे ...
हिंगोली : लाेकमत रक्ताचं नातं या मोहिमेत राज्यभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत हिंगोली येथेही २ जुलै रोजी महावीर भवन येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५४ जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची उपस्थिती होती. तर जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, मिलिंद यंबल, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, के. के. शिंदे, हमीद प्यारेवाले, नगरसेवक श्रीराम बांगर, आमेर अली, जावेद राज, विराट लोकमंचचे शेख नईम शेख लाल, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, बाळू बांगर, प्रद्युम्न गिरीकर, अभय भरतीया, अमित रुहाटिया, संचित गुंडेवार, शिक्षक संघटनेचे रामदास कावरखे, सुभाष जिरवणकर यांनीही रक्तदान शिबिराच्या ठिकाणी हजेरी लावली.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिरात ५४ जणांनी रक्तदान केले. यासाठी अनिल पतंगे मित्रमंडळ, चंदू लव्हाळे मित्रमंडळ, सर्पमित्र मित्रमंडळ, विराट लोकमंच, मनीष आखरे मित्रमंडळ यांनी सहकार्य केले. शासकीय रक्तपेढीचे कर्मचारी आत्माराम जटाळे, बंडू नरवाडे, सतीश तडस, सुनील इंगोले, परमेश्वर कळासरे, नितीन हंडगे यांनी सहकार्य केले.
कर्मचाऱ्यांचेही रक्तदान
लोकमतमधील चार कर्मचाऱ्यांसह ग्रामीणच्या तीन वार्ताहरांनीही रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.