लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील एका सराफा व्यापाºयास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने संबधित ग्राहकास नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत.कळमनुरी येथील अरूणा मुठाळ यांच्या मुलाचा विवाह सोहळा असल्यामुळे त्यांनी हिंगोली येथील सराफा व्यापारी नागेशअप्पा सराफ यांच्या दुकानात सोन्याच्या दागिन्यांची आॅर्डर दिली होती. त्यांनी ईसार म्हणून व्यापाºयाकडे ४६ हजार ३९० रूपये रक्कम जमा केली. अरूणा मुठाळ दागिने आणण्यासाठी गेल्या असता व्यापाºयाने दागिने तयार झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे नाईलाजाने त्यांना दुसºया दुकानातून सोने खरेदी करावे लागले. लग्न सोहळ्यानंतर त्यांनी नागेशअप्पा सराफ यांच्याकडे जमा केलेली रक्कम मागितली. परंतु ती देण्यास व्यापाºयाने नकार दिला. तसेच आॅर्डरची रद्द करता येत नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर रक्कम व आॅर्डर घेतलीच नाही, असे व्यापाºयाने सांगितले. याबाबत सदर महिलेने ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली.न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी व सदस्या एन के. कांकरिया यांनी यात निवाडा केला. तर सदर महिलेस सराफा व्यापाºयाने तीस दिवसांच्या आत ४६ हजार ३९० रूपये, ८ टक्के व्याजदराने आदेश जारी केल्याच्या तारखेपासून द्यावेत. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी ४ हजार, अर्जाचा खर्च १ हजार असा आदेश जारी केला. अर्जदार महिलेतर्फे अॅड. पी. के. पुरी , अॅड. डी. बी. कºहाळे यांनी काम पाहिले.
सराफा व्यापाऱ्यास दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:34 PM