लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील आगारातील कार्यरत वाहक -चालक व यांत्रिकी कामगारांना आता नवीन ड्रेसकोडनुसार थेट शिलाई केलेला गणवेश मिळणार आहे. पूर्वी राज्य परिवहनकडून कर्मचाºयांना कापड व शिलाईची रक्कम दिली जात असे. मात्र आता कर्मचाºयांना थेट महामंडळाचा गणवेश दिला जाणार आहे. हिंगोली आगारात १२५ वाहक, चालक १२१ तर ३३ यांत्रिकी कामगार आहेत.राज्य परिवहन महामंडळाकडून नव-नवीन उपक्रम राबविले जात आहे. दिवसेंदिवस हायटेक होत चालेले महामंडळातील निर्णयामुळे कामाच्या स्वरूपातही बदल झाले आहेत. विशेष म्हणजे वाहक -चालकांच्या गणवेशाचा थोड्याफार प्रमाणात लूक बदलणार आहे. अधिकारी ते कर्मचारी तसेच यांत्रिकी विभागातील सर्वांनाच आता गणवेशावरच कर्तव्य बजावण्याच्या सूचना आहेत. हिंगोली डेपोतील सर्व कर्मचाºयांची माहिती एका फॉरमॅटमध्ये भरून देण्यात आली. यामध्ये गणवेशासाठी लागणारे मोजमाप तसेच इतर आवश्यक माहिती भरून घेण्यात आली होती. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर कर्मचाºयांना तत्काळ गणवेश वाटप केले जाणार असल्याचे हिंगोली डेपोचे आगारप्रमुख पी. डी. चव्हाण यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन करून यावेळी आगारातील अधिकारी व कर्मचाºयांना तसेच यांत्रिकी विभागातील सर्वांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कर्मचाºयांच्या हातीच गणवेश पडत असल्याने त्यांची इतर कटकटीतून आता सुटका झाली.अपघात: वाहक -चालकांच्या गणवेशात रेडीअमएसटीवर कर्तव्य बजावताना अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. यावेळी कार्यरत बसचालक व वाहकांची फजिती होते. परंतु आता नवीन गणवेशात असलेले वाहक व चालक अंधारतही ओळखू येतील. प्रत्येक वाहक व चालकांच्या नवीन गणवेशामध्ये इंग्रजी भाषेत ‘टी’ असे अक्षर आहे.या ‘टी’मध्ये रेडियमचा वापर करण्यात आला आहे. गणवेशात रेडीअम असल्यामुळे आता अंधारामध्ये उभे असलेले कर्मचारी लवकर नजरेस पडतील व त्यांना मदत तत्काळ मदत करणेही सोपे जाईल, असे आगाराप्रमुख यांनी सांगितले.राज्य परिवहन महामंडळातर्फे वाहक व चालकांसाठी खाकी तर यांत्रिकी कामगारांसाठी गडद निळया रंगाचे गणवेश उपलब्ध होणार आहेत. पुर्वीपेक्षा थोडा हटके लुक गणवेशाचा असल्याचे सांगण्यात आले.