केंद्रीय पथकाची हिंगोलीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:24 AM2018-12-07T00:24:54+5:302018-12-07T00:25:50+5:30
जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीत आहेत. उर्वरित दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये येण्यासाठी लढा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर केंद्रीय पथकानेही हिंगोली जिल्‘ाकडे पाठ फिरविली असून ना दाद ना फिर्याद अशी गत झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीत आहेत. उर्वरित दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये येण्यासाठी लढा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर केंद्रीय पथकानेही हिंगोली जिल्‘ाकडे पाठ फिरविली असून ना दाद ना फिर्याद अशी गत झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात केवळ आॅगस्ट महिन्यात सतत चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाची टक्केवारी थोडीबहुत जागेवर आली. मात्र हा पाऊस पिकांना केवळ जिवंत करणारा ठरला होता. त्यानंतर पावसाने दगा दिला. त्यामुळे जिल्हाभर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऐन मोक्याच्या क्षणी पावसाचा पत्ता नसल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. कापूस, तूर, हळद आदी पिके तर वाळून जात आहेत. रबीचा हंगामही येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ज्या भागात कॅनॉलला पाणी सुटले, अशा भागातच पेरणीचा टक्का जास्त दिसून येत आहे. तर काहींनी घाईगडबडीत रबीची पेरणी आटोपली. मात्र आता हा हरभरा, करडई वाळत आहे. त्यामुळे या पेरणीचाही काही फायदा नाही. अनेक गावांत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जलसाठे झपाट्याने रिकामे होत आहेत. आगामी काळात शेतकºयांना गुरांच्या चारा व पाण्यासाठी मोठी मरमर करावी लागणार आहे. या पार्श्वभूमिवर मराठवाड्याच्या दौºयावर असलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने तीव्र दुष्काळी जिल्‘ांतच भेटी दिल्या. त्यातून हिंगोलीला वगळले आहे. तीन तालुके आधीच दुष्काळात असल्याने उर्वरित दोन तालुक्यांना पाहणी पथकाच्या दौºयानंतर न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आता तीही धुसर बनली आहे. या पथकाच्या इतर जिल्‘ांतील दौºयातील पाहणीवरूनच हिंगोलीतील दुष्काळ जाहीर झालेल्या भागाबाबत निर्णय होईल, असे दिसते.