प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने ४ जुलै रोजी लातूर, नांदेड, उस्मानाबाद व हिंगोली, ५ जुलै रोजी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात आणि ६ जुलै रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान वादळी वारे व विजांचा कडाकडाट राहणार आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहून पावसाची शक्यता वर्तविली आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधनास उघड्यावर किंवा पत्रे टाकलेल्या घरात बांधू नये. तसेच पाऊस चालू असल्यास शेतात जाऊन कामे करू नये. विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी, मजुरांनी झाडाखाली थांबू नये, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.