जवळा पां.: कळमनुरी तालुक्यात जवळा पांचाळ परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा पिकांना फायदा होत आहे. गेल्या चार- पाच दिवसांत वातावरण बदलले, थंडीचा जोर वाढला. सूर्यदर्शनही लवकर होत नाही. गहू, हरभरा या पिकांना थंडीचा फायदा होत आहे. हरभऱ्यावर ढगांमुळे अळी पडत आहे.शेकोट्या पेटल्याकरंजी : मागील तीन ते चार दिवसांपासून थंडी वाढल्यामुळे गुंडा परिसरामध्ये सकाळीच्या वेळी व्यायाम करण्यासाठी युवक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. तर रात्री व सकाळीच्या वेळी शेकोट्या पेटत असल्याचे दिसत आहे.
थंडीचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:22 AM