‘डीपीसीतील कामे पूर्ण करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:26 AM2018-12-07T00:26:57+5:302018-12-07T00:27:26+5:30

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.

 'Complete the DPC Work' | ‘डीपीसीतील कामे पूर्ण करा’

‘डीपीसीतील कामे पूर्ण करा’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, आगामी कालावधीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेवून सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात मंजूर झालेला योजनातंर्गत निधींच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा करावा. तसेच तांत्रिक मान्यता मिळालेल्या कामे पूर्ण करून उपलब्ध निधी वेळेत खर्च करावा. सदर निधी समर्पित होणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी.
सर्व संबंधीत विभागांनी दर आठवड्याला कामांचा आणि खर्चित-अखर्चित निधीचा अहवाल सादर करावा. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ अंतर्गत पुनर्विनियोजनाचे प्रस्ताव आणि जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती उपयोजना सन २०१९-२० अंतर्गत सन २०१९-२० चे आराखडे वेळेत नियोजन विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही दिले. अनेक विभागांनी तर अजून निधीचीच मागणी केली नसल्याचे समोर आले.

 

 

 

Web Title:  'Complete the DPC Work'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.