गावात कॉर्नर बैठका वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:20 AM2021-01-01T04:20:27+5:302021-01-01T04:20:27+5:30

गावातील पाण्याचे स्त्रोत आटले बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील विहीर व बोअर आटत चालले आहे. यासाठी गावकऱ्यांना पाण्यासाठी ...

Corner meetings increased in the village | गावात कॉर्नर बैठका वाढल्या

गावात कॉर्नर बैठका वाढल्या

googlenewsNext

गावातील पाण्याचे स्त्रोत आटले

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील विहीर व बोअर आटत चालले आहे. यासाठी गावकऱ्यांना पाण्यासाठी इतरत्र ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. सध्या हिवाळा सुरू असून गावात उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बरेच गावकरी पाण्यासाठी गावातील विहिरीसह बोअरवरचे पाणी वापरत आहेत.

गावातील सांडपाणी रस्त्यावर

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगावात अनेक समस्या आहेत. गावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. त्याचबराेबर नालीचे व्यवस्थापनबरोबर नसल्यामुळे सांडपाणी नालीत जाण्याऐवजी रस्त्यावर येत आहे. यामुळे गावात दुर्गंधी पसरत आहे. यासाठी गावातील कचरा साफ करुन नालीत पाणी जाण्यासाठी व्यवस्थित करण्याची मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

उपकेंद्रातून वारंवार वीजपुरवठा खंडित

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे उपकेंद्रातून पुरविण्यात येणाऱ्या विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. गावातील अनेकदा दिवसा व रात्री वीजपुरवठा खंडित होत आहे. याचबरोबर शेतशिवारातही वीज बरोबर राहत नसल्याने शेतकऱ्यांची शेतीकामे रखडल्या जात आहे. यासाठी उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शेतकरी व गावकऱ्यांतून होत आहे.

खुडज फाट्याजवळ अपघाताचे प्रमाण वाढले

खुडज : सेनगाव तालुक्यातील खुडज फाटाजवळ मागील काही दिवसात बरेच अपघात झाले आहे. गावाजवळून सेनगावकडे जाणारा रस्त्याचे काम झाले असल्याने या नवीन रस्त्यावर अनेक वाहने भरधाव वेगाने धाव आहेत. यामुळे अनेकदा दुचाकीसह चारचाकी वाहनांचा याठिकाणी छोटा - मोठा अपघात होत आहे. मागील चार दिवसापूर्वीच याठिकाणी दोन दुचाकीमध्ये अपघात झाला होता.

गावात सिमेंट रस्त्याची मागणी

साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावात एकही पक्का रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांसह वाहनधारकांना या गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. गावात मुरूमाचे रस्ते असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यांमध्ये चिखल होत असून अनेक गावकऱ्यांचे वाहने यामध्ये फसत असतात.

शेतशिवारात वन्य प्राण्याचा उपद्रव

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना शेत शिवारात वन्य प्राणी घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. या शेतशिवारात गहू व हरभरा पीक बहरले असून या पिकांवर डल्ला मारण्याचे काम वन्य प्राणी करीत आहे. सध्या शेत शिवारामध्ये वानरांची टोळीसह रानडुकर, रोही उपद्रव घालून पिकांची मोठी नासाडी करीत आहे. वन्य प्राण्यांकडून पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी चिंतेत आला आहे.

बससेवा सुरू करण्याची मागणी

पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावासह परिसरात धावणारी कळमनुरी डिपोची बससेवा बंद झाल्याने येथील प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. कळमनुरी येथून आखाडा बाळापूर व नंतर पोतरा, बोल्डा, वाई, पांगरा शिंदे यासह इतर ठिकाणी धावणारी बससेवा बंद झाली आहे. या मार्गावरील गावकऱ्यांची नेहमी आ.बाळापूरसह कळमनुरी ठिकाणी ये - जा सुरू असते. पण ही बससेवा बंद झाल्याने अनेक प्रवासी व गावकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली आगारातून डिग्रस कऱ्हाळे मार्गे जाणाऱ्या भोसी, सिद्धेश्वर, वडचुना, दुरचुना, गांगलवाडी ही ग्रामीण भागातील बससेवा कोरोना संसर्गामुळे बंद होती. सध्या कोरोनाचे थैमान कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. तसेच ग्रामीण भागातील बंद असलेली ही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून हाेत आहे.

Web Title: Corner meetings increased in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.