आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात वरूड गवळी १, मारवाडी गल्ली १, नाईकनगर १, आजेगाव १, वडचुना १, सावरखेडा १, यशवंतनगर १, जिजामातानगर १, औंढा १, पळसोना १, अकोला बायपास १, रिसोड २, जि.प. क्वार्टर १, मेथा १, एरंडेश्वर पूर्णा १, रिसाला बाजार १, शिवाजीनगर १, वसमत १, कटके गल्ली १, दुधाळा १, बोरडवाडी १, आडगाव १, भोसी १ असे २४ रुग्ण आढळले. वसमत परिसरात सिद्धार्थनगर १, बालाजीनगर २, मंगळवारपेठ २, सोमवारपेठ १, कोठारी १, पिंपळा चौरे २, बाभूळगाव १, वेडसंगी १, पोलीस क्वार्टर १, मोहगाव १, चोंढी १, मोंढा रोड १, पॉवरलूम १, मुुरुंबा १, पंचशीलनगर ४, शुक्रवारपेठ १, म.फुलेनगर २, विद्यानगर १, सत्यनारायणनगर २, कुरुंदा १, कौठा वसमत १, काजीपुरा १, पाटीलनगर २, श्रीराम गल्ली १, सती पांगरा १, बहिर्जीनगर १, फुलेनगर १ असे ३६ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात हत्ता ४, सेनगाव २ असे ६ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात डोंगरकडा २३, जवळा पांचाळ २, वारंगा फाटा ४, कळमनुरी १९, शिवनी २, धानोरा १, आडा १, सांडस ५, दाती १, सिंदगी १, रेडगाव १, अर्धापूर १, चिंचोली १, सालेगाव १, बेलथर १, तुप्पा २, बाभळी १ असे ६७ रुग्ण आढळले.
आज बरे झालेल्या २१६ जणांना घरी सोडले. यात जिल्हा रुग्णालयातून ३४, लिंबाळा ३८, वसमत ८५, कळमनुरी ४४, औंढा ११, तर सेनगावातून ४ जणांना घरी सोडले.
सात रुग्णांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयात कासारखेडा, नांदेड येथील ६० वर्षीय महिला, ज्योतीनगर हिंगोली येथील ५५ वर्षीय पुरुष व येडशी तांडा कळमनुरी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. कळमनुरी रुग्णालयात विकासनगर कळमनुरी येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. द्वारका हॉस्पिटल एनटीसी येथे सेनगाव येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. नवीन कोविड हॉस्पिटल औंढा रोड येथे शेवाळा, ता. कळमनुरी येथील ६५ वर्षीय पुरुष, सिंदेफळ सेनगाव येथील ३८ वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला. आजपर्यंत १५१ मृत्यू झाले.
गंभीर रुग्ण ३७७
आजपर्यंत १०००३ रुग्ण आढळले, तर ८६०९ जण बरे झाले. सध्या १२४३ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या ३५० आहे, तर अतिगंभीर २७ जणांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.