कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:20 AM2021-06-27T04:20:14+5:302021-06-27T04:20:14+5:30

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र ...

Corona, sleep deprived by MobileVeda! | कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप!

कोरोना, मोबाईलवेडाने उडविली झोप!

Next

हिंगोली : पूर्वी लवकर झोपा आणि लवकर उठा हा मंत्र देत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायची. मात्र आता मोबाईल, टीव्ही पाहण्याचा छंद, कोरोना काळातील विविध चिंतांनी अनेकांची झोपच उडविली आहे.

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण जगातच कोरोनाने कहर केला. त्याचा प्रत्येक बाबीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. रोजगार, व्यवसायात अनेक प्रश्न निर्माण झाले. रिकामेपणी अनेकांना मोबाईल अथवा टीव्ही पाहत बसून जागरणाची सवय जडली, तर काहींना या चिंतांनी ग्रासल्याने झाेप येत नाही. अशांपैकी अनेक जण डॉक्टरांकडे हजेरी लावून मला झोपच येत नसल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. त्यातच अंगमेहनतीची कामे कमी झाल्यानेही अनेकांना झोपेच्या त्रासाचा सामना करावा लागतो, तर दिनचर्या बदलल्याचा काहींना फटका बसत असल्याचे दिसत आहे.

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम

सततच्या जागरणाने रक्तदाबाचा त्रास होतो.

हृदयविकाराचा त्रासही जाणवण्याची भीती

मधुमेहाचा आजारही जडू शकतो.

इतरही शारीरिक व्याधींचा धोका

वयोमानानुसार झोपेचे तास ठरतात. त्यातुलनेत सतत अनेक दिवस झोप न लागल्यास विविध व्याधी जडू शकतात. वेळेवर झोपणे व उठणे ही चांगली सवय आहे.

-डॉ. यशवंत पवार

झोप का उडते

जास्त ताणतणावात दिवस गेल्यास अथवा चिंता वाढल्यास झोप लागत नाही. शिवाय मोबाईल अथवा टीव्हीची सवय लागली तरीही असे घडते.

जे लोक शारीरिक श्रम करीत नाहीत, अशांनाही लवकर झोप न लागल्याच्या समस्या अनेकदा जाणवतात.

गंभीर आजार असल्यास किंवा वैयक्तिक जीवनातील अडचणींमुळेही निद्रानाशाची चिंता भेडसावू शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको

अनेकजण झोप येत नसल्याने त्यावरील योग्य उपाय शोधण्याऐवजी थेट झोपेच्या गोळीचा आग्रह धरतात. मात्र, ती एक घातक सवय ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी घेणे टाळणेच हिताचे राहील.

नेमकी किती झोप हवी

नवजात बाळ १२ ते १४ तास

एक ते पाच वर्षे १० ते १२ तास

शाळेत जाणारी मुले १० ते १२ तास

२२ ते ४० वर्षे ८ ते ९ तास

४१ ते ६० ८ तास

६१ पेक्षा जास्त १० तासांपर्यंत

चांगली झोप यावी म्हणून

सकाळी लवकर उठावे

व्यायाम व शारीरिक कष्ट करावे.

आहार व्यवस्थित व वेळेवर घ्यावा.

मानसिक त्रागा करू नये.

योग्य व प्रामाणिक काम करून व्यायाम, प्राणायाम, विपश्यना, आदी केल्यास झोपेबाबतची कोणतीच तक्रार राहणार नाही.

- डॉ. गोपाल कदम

Web Title: Corona, sleep deprived by MobileVeda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.