कौटुंबिक हिंसाचार रोखण्यात कोरोनाचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:37+5:302021-03-04T04:56:37+5:30

हिंगोली : कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेल्याने आर्थिक घडी विस्कळीत झाली. परिणामी, अनेक जिल्ह्यांत कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र ...

Corona's role in preventing domestic violence | कौटुंबिक हिंसाचार रोखण्यात कोरोनाचा हातभार

कौटुंबिक हिंसाचार रोखण्यात कोरोनाचा हातभार

Next

हिंगोली : कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेल्याने आर्थिक घडी विस्कळीत झाली. परिणामी, अनेक जिल्ह्यांत कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. याउलट हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचार रोखण्यात कोरोनाची मदत झाल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. त्यामुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हाताला काम नसल्याने अनेक महिने घरी थांबावे लागत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद होऊन प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत गेली आहेत. इतर जिल्ह्यांत कोरोनाकाळात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असले तरी हिंगोली जिल्ह्यात मात्र कोरोनामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. उलट कोरोनाने अनेकांना संकट काळात जोमाने कसे उभे राहायचे, याचा मार्ग दाखविला. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे दाखल झाली. त्यात सासू- सासऱ्याचा त्रास, घर, वाहन घेण्यासाठी पैशांची मागणी, संशय आदी कारणे नमूद करण्यात आली आहेत. २०१९ च्या तुलनेत २०२०- २१ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

आई- वडिलांचा हस्तक्षेप, संशयाची कारणे

कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. आई- वडिलांचा हस्तक्षेप, चारित्र्यावर संशय, हुंडा, घर बांधण्यासाठी पैशाची मागणी, सासू- सासऱ्याचा त्रास, पाश्चिमात्य संस्कृती आदी कारणे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे नोंदविताना दिली जात आहेत.

३९३ प्रकरणांमध्ये मध्यस्थी

जिल्ह्यात २०१९ पासून आतापर्यंत कौटुंबिक हिंसाचाराची १ हजार ३४० प्रकरणांची नोंद झाली आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमधील महिलांना न्याय देण्याची भूमिका येथील भरोसा सेलच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळेच २०१९ मधील ६७६ प्रकरणांपैकी १८७ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यास मदत झाली आहे, तसेच कोरोना काळातही म्हणजे २०२० मधील ५५४ प्रकरणांपैकी १६१, तर २०२० मधील ११० पैकी ४५ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

२०१९ मध्ये नोंदविलेली प्रकरणे- ६७६

२०२० मध्ये नोंदविलेली प्रकरणे- ५५४

२०२१ मध्ये नोंदविलेली प्रकरणे- ११०

Web Title: Corona's role in preventing domestic violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.