गु-हाळाच्या कढईत पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:56 PM2019-01-31T23:56:01+5:302019-01-31T23:56:16+5:30
येथील एका खाजगी गुळ कारखान्यात काम करणाऱ्या तरूणाचा उसाच्या गरम रसामध्ये पडून भाजल्यामुळे एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : येथील एका खाजगी गुळ कारखान्यात काम करणाऱ्या तरूणाचा उसाच्या गरम रसामध्ये पडून भाजल्यामुळे एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जवळा बाजार येथे गूळकारखान्यात काम करणारे कामगार गौरवकुमार रंजीत सिंह (१९, रा.जवळा बाजार) ता.औंढा हे २२ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता गुळ कारखान्यात उसाच्या तीन कढईची साफसफाई करीत असताना त्याचा अचानक पाय घसरून तो एका कढईत पडला. सदर घटनेनंतर जखमी उपचारासाठी नांदेड येथील शंकरराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. तेथून मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलविले असता उपचार सुरू असताना २८ डिसेंबर २०१८ रोजी ८ वाजता त्यांचे निधन झाले. रणजितसिंग रामसिंग (रा. जवळा बाजार) यांच्या माहितीवरून हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.