ठेवीदार-पिग्मी ग्राहकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:23 PM2018-01-29T23:23:49+5:302018-01-29T23:24:21+5:30
दि. शुभकल्याण मल्टीस्टेट को- आॅफ सोसायटी लि. हावरगाव शाखा हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी येथील ग्राहाकांच्या फसवणुकीत गुन्हा दाखल झालेल्या संचालक आरोपींना अटक करुन शाखेत ठेव ठेवलेली रक्कम परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवीदार व पिग्मी ग्राहकांनी २९ जानेवारी पासून उपोषण सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दि. शुभकल्याण मल्टीस्टेट को- आॅफ सोसायटी लि. हावरगाव शाखा हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी येथील ग्राहाकांच्या फसवणुकीत गुन्हा दाखल झालेल्या संचालक आरोपींना अटक करुन शाखेत ठेव ठेवलेली रक्कम परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवीदार व पिग्मी ग्राहकांनी २९ जानेवारी पासून उपोषण सुरु केले आहे.
या फसवणूक प्रकरणात एकूण ११ संचालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन जवळपास ६ महिने उलटले आहेत. अद्यापपर्यंत यातील एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही.
विशेष म्हणजे हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुनही काहीच तपासच संथगतीने होत असल्यामुळे रक्कम मिळण्यास दिरंगाई होत आहे. तसेच बँकेत गुंतवणूक केलेल्या ग्राहकांकडूच गुंतवणूकदारांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर अधून - मधून घरी येऊन घरच्या मंडळीनाही मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच पोलीस प्रशासनानेही ठेवीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी अनेकदा आश्वासने दिली. त्यातील एकही आश्वासन पुर्ण केलेले नाही. त्यामुळे ग्राहक एजंटाच्या घरी जावून शिवीगाळ करीत आहेत. तर २९ आॅगस्ट २०१७ रोजी हिंगोली येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती.
कार्यवाहीच झाली नसल्याने २९ जानेवारी पासून ग्राहकांसह एजंटनी उपोषण सुरु केले आहे. शाखेत ठेव ठेवलेली रक्कम परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवीदार व पिग्मी ग्राहकांनी उपोषण सुरू केल्यानंतर आता तरी याची दखल घेत त्यांची मागणी पूर्ण केली जाईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे.