संचारबंदीतही जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढूच लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:39+5:302021-05-05T04:48:39+5:30
३१ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात १५ हजार ६९७ अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या झालेल्या आहेत. या दरम्यान, १८०० ...
३१ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात १५ हजार ६९७ अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या झालेल्या आहेत. या दरम्यान, १८०० नागरिकांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.
१५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत २० हजार ६०० तपासण्या करण्यात आल्या आहेत. या दरम्यान ३ हजार १६३ नागरिकांना घरीही सोडण्यात आले आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
गत दोन महिन्यांपासून ग्रामीण भाग व शहरी भागांतही रुग्ण वाढल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
-डाॅ. देवेंद्र जायभाये, हिंगोली