लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीजग्राहकांना आॅनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या १ डिसेंबर २०१८ पासून प्रतिबिल १० रुपये सवलत दिली जाणार आहे.महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबील भरण्यासाठी मोबाईल ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या संकेतस्थळावर आॅनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ई-मेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. या सर्व ग्राहकांना आता १ डिसेंबरपासून प्रतीबील १० रुपये सवलत मिळणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावरँ३३स्र२://ु्र’’्रल्लॅ.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल/ॅङ्मॅ१ीील्ल.स्रँस्र येथे जाऊन करावी लागेल. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून ते जतन करणे सोपे होणार. गो-ग्रीन वापरण्याचे आवाहन महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी केले.
आॅनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना मिळणार सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:20 AM