लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत विविध कारणांनी वाद उभे राहण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र त्यामुळे थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या किंवा धमकावण्याच्या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत. पदाधिकारी यावर मार्ग काढण्यासाठी आता बैठक घेण्याची तयारी करीत आहेत.जिल्हा परिषदेत यापूर्वी कधी नव्हे, एवढे वादाचे प्रकार घडू लागले आहेत. गत दोन वर्षांपासून विविध कारणांनी कामे ठप्प राहात गेली. त्याचा परिणाम म्हणून सदस्य आता प्रत्येक कामात घाई करू लागले आहेत. आमदार, खासदार एवढेच काय तर मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जर्जर झालेले सदस्य आता किरकोळ कामांसाठीही आक्रमक होत आहेत. मात्र त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर धावून जाण्याचे प्रकारही घडू लागल्याने बिघडणाºया शिस्तीला लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे.स्थायीच्या समितीत सभापतींनीच अधिकाºयाला चुकीच्या भाषेत खडसावले. त्यानंतर लागलीच दुसºया दिवशी एका जि.प.सदस्याने प्रभारी उपअभियंत्यावर हात उगारला. ही दोन्ही प्रकरणे समोपचारामुळे जागीच विरली. तर यामुळे जि.प. सदस्यांचे मनोबल वाढत चालले म्हणून की काय, आणखी एका पट्टेदार ‘वाघ’ाने वित्त विभागातच जावून धमकावले. त्यामुळे सदर अधिकारी नाराजीने निघून गेले. ते रजा टाकण्याच्या तयारीत आहेत. मात्र सायंकाळी उशिरा हा वाद पदाधिकाऱ्यांपर्यंत गेला. चुकीचे काम आणून त्यावर स्वाक्षºया कशा द्यायच्या? यात चौकशी झाली तर आमची नोकरी जाईल, मग अशा ठिकाणी कामच कशाला करायचे? अशी या विभागातील कर्मचाºयांची भावना आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांना परत बोलावून पदाधिकारी व गटनेत्यांची बैठक घेण्याची तयारी चालू आहे.समोपचाराची गरजआजचा प्रकार चुकीचे काम रेटण्यामुळे घडल्याने त्याचे कुणीच समर्थन करीत नव्हते. मात्र बºयाच ठिकाणी योग्य संचिकाही अडत असल्याचा मुद्दा काही सदस्य मांडत होते. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाºयांकडून सूचनांची अपेक्षा आहे. मात्र ही समोपचाराची भूमिका न घेता थेट अधिकाºयांच्या अंगावर जाणे हे कोणत्याच प्रकारे संयुक्तिक व समर्थनीय नाही.जिल्हा परिषदेची १३ विभागाची यंत्रणा चालविताना त्यातील अडी-अडीचणी सोडविण्यासाठीच पदाधिकारी आहेत. मात्र अनेकजण पदाधिकाºयांचा दरवाजा न ठोठावता थेट अधिकाºयांशी भिडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला वादाची लागण लागली आहे. दररोज एक प्रकरण घडू लागल्याने अधिकारीही आणखीच दिरंगाईची भूमिका घेतात. त्यामुळे अडचणीच्या वेळी पदाधिकाºयांकडे बंद दाराआड रास्त प्रश्न सोडविणे शक्य आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी होणाºया गोंधळाचे वाईट परिणाम होत आहेत. यात मार्च एण्डच्या तोंडावर कोट्यवधीच्या निविदा अडकून पडण्यासह जि.प.ची प्रतिमाही डागाळत आहे.
जि.प.ला लागली वादाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 11:36 PM