सोशल मीडियावरील बनावट मेसेजला बळी पडू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:54 AM2021-03-13T04:54:47+5:302021-03-13T04:54:47+5:30
१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या महिलेच्या घरातील २१ ते ७० वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनाने ...
१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या महिलेच्या घरातील २१ ते ७० वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनाने निधन झाले आहे, अशा विधवा महिलांना महिला व बालविकास विभागाच्या राजमाता जिजाऊ योजनेंतर्गत वर्षाला प्रति लाभार्थी ५० हजार रुपये मिळतील तसेच अधिक माहितीसाठी पूजा रमेश पाटील व ऊर्फ पूजा आकाश ठक्कर यांना ७०१६१६९०४५ या मोबाईल क्रमांकावर सकाळी १० ते सायं ६ या वेळेत संपर्क साधावा, अशी पोस्ट व्हॉट्सअप या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट खोटी व बनावट असून अशाप्रकारची कोणतीही योजना महिला व बालविकास विभागामार्फत कार्यान्वित नाही. तसेच या मेसेजमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असून अशा मॅसेजला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.