दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरून जाऊ नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:43+5:302021-05-05T04:48:43+5:30
सद्यस्थितीत जिल्ह्यात कोविशिल्ड ३,७६० तर कोव्हॅक्सिन ३५० डोसेस आहेत. ग्रामीण भागात वाकोडी, पिंपळदरी, लोहरा येथे लसीकरण सुरू आहे. ...
सद्यस्थितीत जिल्ह्यात कोविशिल्ड ३,७६० तर कोव्हॅक्सिन ३५० डोसेस आहेत. ग्रामीण भागात वाकोडी, पिंपळदरी, लोहरा येथे लसीकरण सुरू आहे. शासनाच्या सूचनेनुसार १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीला लसीकरण करणे सुरू केले आहे. आतापर्यंत १४ ते ४४ वयोगटातील १२०४ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लसीकरणासंदर्भात युवकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. १ मेपासून लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे शासनाने कळविले आहे. जिल्ह्यात दोन्ही लस कमी असल्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा. जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर लसीकरण चालू असते, त्यावेळी गोंधळ करू नये. लस लवकर कशी उपलब्ध होईल, यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली शासनाला पत्रही पाठविल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
प्रतिक्रिया
सध्या सर्वत्र दोन्ही लसीचा तुटवडा आहे. शासन सर्वच नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देणार आहे. दुसरा डोस मिळाला नाही म्हणून कुणीही घाबरून जाऊ नये. लसीबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले आहे. दोन-तीन दिवसात लस येईल. लस आल्यानंतर कुणीही केंद्रावर गडबड करू नये. शांततेने लस घ्यावी.
- प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.
बॉक्स
दुसऱ्या डोससाठी दोन-तीन दिवस थांबा...
कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीबाबत जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे शासनाला पत्रही दिले आहे. विशेष म्हणजे १ मेपासून युवकांचा लस घेण्याकडे कल वाढला आहे. दुसरा डोस अनेकांना मिळाला नसल्यामुळे त्यांच्यात धाकधूक आहे. दोन-तीन दिवसात दुसराही डोस मिळेल, असे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.