लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील वर्षी नाफेडने व न तर खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून थांबत थांबत खरेदी केली होती. तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती. त्या खरेदीचे देयकेही विलंबाने मिळाले होते. यावर्षी तर यंत्रणाच ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मागील वर्षी तुरीची खरेदी कमी अन् गोंधळच जास्त झाला होता. तूर विक्रीस घेऊन येणाºया शेतकºयांना सात ते आठ दिवस मुक्काम ठोकण्याची वेळ आली होती. अशाही परिस्थिती शेतकºयांने तूर विक्री करुन त्यांचे चुकारे घेण्यासाठी खेटे करण्याची वेळ आली होती. हिंगोली येथील केंद्रावर तुरीची आवक लक्षात घेता जिल्ह्यात खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात आली. या ठिकाणी तूर नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली असली तरीही त्या- त्या ठिकाणच्या यंत्रणेसह वरिष्ट कार्यालयातील यंत्रणा देखील नॉट रिचेबल असल्याने नोंदणी करण्याचा प्रश्न शेतकºयांसमोर गंभीर बनला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकरी ४ ते साडेचार हजार रुपये माती मोल दारांने विक्री करीत आहेत. केंद्रामध्ये नोंदणी करण्यासाठी चांगलीच वानवा होत असल्याने शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत. विशेष म्हणजे खरेदी केंद्रावर खरेदी कमी अन् गोंधळच जास्त होत असल्याने मोजक्याच शेतकºयांचे नोंदणीसाठी पाऊल वळत आहेत. हिंगोली येथील कृउबामध्ये जवळपास १ हजार ते १२०० पर्यंत तूर विक्री करण्यासाठी नोंदणी झाल्याची माहिती आहे. मागील वर्षी तर खरेदी करताना झालेल्या गोंधळामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांनी खाजगी बाजारात तुरीची विक्री केली होती. निदान ती या वर्षी तरी टळणे अपेक्षीत आहे.खळबळ : नेहमीच दिली जात आहेत कारणेजिल्ह्यातील शेतकºयांची शेती माल विक्रीसाठी करण्यासाठी होणारी गैरसोय दुर व्हावी म्हणून पाच केंद्र सुरु केले आहेत. परंतू तेथे असा एखांदाच दिवस असेल की त्या दिवशी शांतेत खरेदी झाली. त्यामुळे शेतकरी शेती मालाच्या विक्रीसाठी गोंधळून जात आहेत. आता तूरही संपण्याच्या आकारात आली असूनखरेदी केंद्र सुरु होणार तरी कधी आहेत. असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. तसेच संंबंधित विभागाकडे नोंदणी झाल्याची माहिती विचारल्यास नेहमीच वेग- वेगळी कारणे दिली जात आहेत. त्यामुळे नोंदणीसाठी प्रतिसाद कसा आहे हे सांगणे कठीण आहे.शेती मालाच्या विक्रीसाठी नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली असली तरीही, नियोजनाचा अभाव असल्याने नोंदणीसाठी शेतकºयांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
तूर नोंदणी करणारी यंत्रणा ‘नॉटरिचेबल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:21 PM