लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील अकोला बायपास परिसरात ट्रॅक्टर वाळू घेऊन जाताना महसूल पथक समोरुन आल्याचे लक्षात येताच, घाई गडबडीत वाळू रस्त्यावर फेकून ट्रॅक्टरसह चालकाने पळ काढला. पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग केला. परंतु ते मिळून न आल्याने ट्रॅक्टर चालकाविरुद्ध शहर पोलीसात ठाण्यात गुन्हा दाखल केला.वाळू वाहतुकीवर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक सुरु आहे. त्यामुळे महसूल पथकाने वाळूची वाहतूक थांबविण्यासाठी वेग- वेगळी पथक तयार केले आहेत. एवढेच काय तर महिलाचेही पथक तयार केले आहे. रविवारी दिडच्या सुमारास अकोला बायपास परिसरात एक ट्रॅक्टर वाळू घेऊन जात होते. दरम्यान पथकाची गाडी चालकाच्या लक्षात येताच ट्रॅक्टर चालकाने चालू मध्येच ट्रॅक्टर मधील वाळू रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला. हा प्रकार पाहण्यासाठी या ठिकाणी एकच गर्दी झाली होती. रस्त्यावर लांबलचक वाळू पडली होती. वाळू वाहतुकीवर होणाºया कारवाई मुळे ट्रॅक्टर चालकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. रस्त्यावर फेकलेल्या वाळूची चर्च परिसरात चांलीच रंगली होती. तर रस्त्यावरुन ये- जा करणारे रस्त्यावर पडलेल्या वाळूचे फोटो काढून घेत होते.
रस्त्यावर वाळू फेकून ट्रॅक्टरसह चालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:06 AM