पंखे, कुलर काढले दुरुस्तीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:33+5:302021-03-04T04:56:33+5:30
रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले हिंगोली : येथील नगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मुख्य चौकासह इतर ...
रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले
हिंगोली : येथील नगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मुख्य चौकासह इतर सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा कर्मचारी उचलत आहेत. मात्र अनेक व्यापारी, नागरिक दिवसभरातील कचरा रस्त्यावर टाकत आहेत. यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देऊन रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नेटवर्कअभावी ग्राहक त्रस्त
हिंगोली : जिल्ह्यात मोबाइल सीम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांची सख्या जास्त आहे. बहुतेक मोबाइल सीमकार्ड कंपन्या नेटवर्क चांगले असल्याचा दावा करीत असल्या तरी अनेक ग्राहकांना नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मोबािल आता अत्यावश्यक वस्तू बनली असून, सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. नेटवर्कच गायब राहत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष देऊन नेटवर्क उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.