चित्रपट अभिनय व निर्मिती कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:56 PM2018-01-13T22:56:21+5:302018-01-13T22:56:34+5:30

स्थानिक अभिनय करणाºया युवक युवतींना सुवर्णसंधीचे दालन मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद, जिल्हा उद्योग केंद्र हिंगोलीद्वारा चित्रपट अभिनय व चित्रपट निर्मिती मार्गदर्शन परिसंवाद १७ ते २९ जानेवारीदरम्यान आयोजित केला.

 Film Acting & Production Workshop | चित्रपट अभिनय व निर्मिती कार्यशाळा

चित्रपट अभिनय व निर्मिती कार्यशाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : स्थानिक अभिनय करणाºया युवक युवतींना सुवर्णसंधीचे दालन मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद, जिल्हा उद्योग केंद्र हिंगोलीद्वारा चित्रपट अभिनय व चित्रपट निर्मिती मार्गदर्शन परिसंवाद १७ ते २९ जानेवारीदरम्यान आयोजित केला.
यात चित्रपट सृष्टीमध्ये करिअर करू इच्छिणाºयासाठी प्रसिध्द अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक श्याम धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रभावी संभाषण कौशल्य, व्हॉईस मॉड्यूलेशन, चेहºयावरील हावभाव, शॉर्टकट डिव्हिजन्स, गीत लिखान, फिल्म निर्देशन, इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम हा सशुल्क असुन याची नोंदणी करण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी दुपारी 4.00 वाजेपर्यंत आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे नाव आरक्षित करायचे आहे. या कार्यशाळेमध्ये फक्त ३0 प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ शकतील. त्यामुळे वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी कळविले आहे

Web Title:  Film Acting & Production Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.